Home शासकीय उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

18 second read
0
0
7

no images were found

उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर (प्रतिनिधी): -शहरामध्ये उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा. ज्या ज्या ठिकाणी गटारे, चॅनल बंदीस्त केली आहेत ती गटारे अथवा चॅनल खुली करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या. आयुक्त कार्यालयात आपत्तीपूर्व नियोजनाच्या बैठकीत या सूचना केल्या.

            गुरुवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अवघ्या काही मिनिटात शहरातील सखल भागात पाणी साचले होते. यावर्षी मान्सून शंभर टक्केच्यावर पडण्याचा अंदाज असल्याने सर्वांनी सज्ज रहावे. अजूनही काही ठिकाणी गाळ अथवा प्लॅस्टीक चॅनलमध्ये अडकले आहे ते काढून घ्यावे. सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाने समन्वय ठेऊन कामे करावीत. वारंवार चोकअप होणारी ठिकाणे निश्चित करुन घ्यावीत. त्या ठिकाणी समन्वयाने सातत्याने स्वच्छता करुन घ्यावी. स्थलांतरीत करण्यात येणा-या निवारा केंद्रांची  तपासणी करुन आवश्यक तिथे दुरुस्ती करा. खाद्य गाड्यांवरील कचरा नाल्यामध्ये अथवा गटारीमध्ये टाकला जातो का याची तपासणी करा. दैनंदिन कचरा गाडीवाले कोठे टाकतात याची तपासणी करा. यासाठी अतिक्रमण विभागाने गाडांची तपासणी करुन त्यांच्यावर कारवाई करावी. प्रामुख्याने बॉटल, चिकन व इतर प्लॅस्टीक पिशवीतून गटारीत अथवा चॅनलमध्ये आढळून येत आहेत. मोठे नाले स्वच्छ झाल्याने ते वाहते आहेत. प्रामुख्याने छोटया नाल्यांमध्ये पुन्हा प्लॅस्टीक कचरा अडकून चोकअप होत आहे. ते नाले साफ केले तरीही पुन्हा कचरा टाकल्याने चोकअप होतो त्यामुळे अशा ठिकाणांवर लक्ष ठेवा. खाजगी जागेत व्यापा-यांडून जे होर्डिग्ज अथवा बोर्ड उभे केलेत ते मंजूरी नसलेस तातडीन काढून घेण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसरांना दिल्या. अतिवृष्टीमुळे ज्या ज्या घरात पाणी गेलेत त्या ठिकाणचे पंचनामे करा. कालचा आजचा फोटो काढून घ्या. धोकादायक इमारंतीवर कारवाई करावी. चॅनलध्ये एमएसईबीच्या केबल अडथळा होत असलीत तर त्यांना तसे लेखी कळवून त्या केबल वरली उचला अथवा चॅनलच्या खालून अंडर ग्राऊंड टाकून घेण्याचे लेखी पत्र शहर अभियंता यांनी देण्याच्या सूचना केल्या.

         यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे उपस्थित हेाते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रि…