Home शासकीय अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

13 second read
0
0
11

no images were found

अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी):- शहरामध्ये गुरुवारी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शहरातील सखल भागात 20 ठिकाणी पाणी साचले होते. या ठिकाणी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी पाहणी केली. या ठिकाणी कोणत्या कारणाने पाणी साचले याची त्यांनी माहिती घेऊन संबंधीत अधिका-यांना तेथे तातडीने उपाययोजना करुन सफाई करण्याच्या सूचना दिल्या.

         शहरामध्ये गुरुवारी साधारणत: 50 मि.मि.च्या वर पाऊस अवघा 3 तासात पडला होता. महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याने काल भर पावसात पाणी साठलेल्या भागातील पाणी निचरा करण्याचे काम रात्रौ उशिरापर्यंत सुरु होते. यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी, आरोग्य निरिक्षक व आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरुन काम करत होते. सकाळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी कसबा बावडा वेटोळे मळा, कमदवाडी जाधववाडी रोड, मेनन बंगल्याजवळील आयाप्पा स्वामी मंदिर, परिख पुल, दसरा चौक, जनता बझार चौक, रंकाळा चौपाटील या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी चॅनेल ब्लॉक झालेत त्या त्या ठिकाणी सातत्याने स्वच्छता व चॅनेल साफ करावेत. त्याचबरोबर मुख्य रस्त्याच्या कडेला स्ट्रॉम वॉटरसाठी असलेले व्हीप होल गाळाने भरले असल्यास ते क्लीन करा. नाल्यातून वाहून येणारे प्लॅस्टीक वेळोवेळी काढण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक यांना दिल्या. रस्त्यावरील जे मेनहोल खाली गेलेत ते उचलून घ्याव्यात, मोठे खड्डे पडलेत ते मुजवून घ्यावेत, मुख्य रस्त्यावर कामासाठी खड्डे काढले असतील तर तेथे बॅरेकेट लावून घेण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.

         यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, जल अभियंता रमेश मस्कर आदी उपस्थित होते.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रि…