Home Video पंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन..

पंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन..

29 second read
0
0
16

no images were found

 

     पंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन..

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापुरातील शिवाजी पार्क परिसरातील पंचशील हॉटेल चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारी वाहनांची ये जा आणि याच चौकात  एसटी बसेस तसेच के एम टी बसेस  तसेच अन्य अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात याच्या विरोधात  आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवा सेनेने आक्रमक पवित्रा घेत येथून वळण घेणाऱ्या  वाहनांना  ताराराणी चौकाकडे पाठवत तिथून वळण घेऊन येण्यास भाग पाडले. 

 बंद करा बंद करा जीवघेणी वळणे बंद करा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.. 

      या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या  अवजड वाहनांनी घेतलेल्या टर्न मुळे  अनेकदा अपघात आणि  नागरिक जखमी होत असल्याच्या घटना  घडत होत्या, या विरोधात आज युवा सेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

 युवा सेनेचे कोल्हापूर शहर सरचिटणीस विपुल भंडारे यांच्या पुढाकारातून  झालेल्या आंदोलनानंतर सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार मोरे  यांच्याशी या बाबतीत भेट घेऊन चर्चा केली. व सदर गोष्टीचे गांभीर्य त्यांना पटवून सांगण्यात आले. यावेळी  त्यांनी सदर बाबतीत एसटी महामंडळ, तसेच इतर संबंधित घटकांना या संदर्भात सूचना दिल्या असल्याचे सांगून भविष्यात अशा घटना  होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.

     या शिष्टमंडळात युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अविनाश कामते, शहर प्रमुख पियुष चव्हाण, शिवसेनेचे रुपेश इंगवले, युवासेना उत्तर विधानसभा अध्यक्ष शैलेश साळोखे, सरचिटणीस दादू शिंदे, युवती सेना शहर प्रमुख सौ.तेजस्विनी घाटगे, उपशहर प्रमुख वल्लारी वाले,पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक सौरभ कुलकर्णी, शहर समन्वयक मंगेश चितारे, उपशहर प्रमुख अभिषेक ढेरे, उपशहर प्रमुख विनायक मंडलिक, उपशहर प्रमुख आफान बागवान,समरजित मोहिते,वैष्णव गवळी ,आदित्य शिंदे ,रत्नदीप शिंदे ,वैभव माने , सुमित मधाळे आदी उपस्थित होते…

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रि…