
no images were found
अदाणी सिमेंट आणि क्रेडाई शाश्वत शहरी बांधकाम उंचावण्यासाठी एकत्र
• अदाणी सिमेंट आणि क्रेडाई यांनी गोव्यातील क्रेडाईच्या गव्हर्निंग कौन्सिल मीटिंगमध्ये एक खास प्राधान्य भागीदारी करार केला• सध्या भारतातील गृहनिर्माण आणि पायाभूत प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिमेंटपैकी जवळपास 30% सिमेंट अदाणी सिमेंट पुरवत आहे; या करारामुळे क्रेडाई सदस्य थेट अदाणीच्या मजबूत पुरवठा साखळीचा लाभ घेऊ शकतील• ही भागीदारी अदाणी सिमेंटची B2B (व्यवसाय ते व्यवसाय) स्थिती बळकट करते आणि भारतातील रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील त्याच्या बांधिलकीला अधोरेखित करते• 100 दशलक्ष टन वार्षिक उत्पादन क्षमता ओलांडल्यानंतर अदाणी सिमेंटसाठी ही आणखी एक महत्त्वाची भागीदारी ठरते• क्रेडाई सदस्यांना अदाणी सिमेंटच्या प्रीमियम उत्पादनांचा, काँक्रीट सोल्यूशन्स व तांत्रिक कौशल्याचा थेट लाभ मिळेल, ज्यामुळे दर्जेदार व शाश्वत शहरी विकास घडवण्यात मदत होईल
अहमदाबाद,: अदाणी सिमेंट आणि क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया) यांनी भारतात शाश्वत व उच्च दर्जाच्या बांधकामासाठी एक विशेष प्राधान्य भागीदारी जाहीर केली आहे. ही भागीदारी गोवा येथील राजधानी पणजीमध्ये पार पडलेल्या क्रेडाईच्या गव्हर्निंग कौन्सिल मीटिंगमध्ये, माननीय मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला क्रेडाईचे पदाधिकारी आणि देशभरातील नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपर्स उपस्थित होते.
ही धोरणात्मक भागीदारी अदाणी सिमेंट आणि खाजगी रिअल इस्टेट डेव्हलपर्सची प्रमुख संस्था क्रेडाई यांना एकत्र आणते, ज्यामुळे दोन्ही संस्थांना आणि संपूर्ण बांधकाम उद्योगाला फायदा होणार आहे. या कराराअंतर्गत, अदाणी सिमेंट क्रेडाईच्या देशभरातील 13000 हून अधिक डेव्हलपर्सच्या नेटवर्कचा उपयोग करून आपली B2B पोहोच वाढवणार आहे, तर क्रेडाईचे सदस्य अदाणी सिमेंटच्या उद्योगात आघाडीच्या समाधानांचा लाभ घेऊ शकतील.
अदाणी ग्रुपच्या सिमेंट व्यवसायाचे सीईओ श्री. विनोद बहेटी म्हणाले: “क्रेडाईसोबतची आमची ही विशेष भागीदारी शाश्वत आणि नाविन्यपूर्ण बांधकामाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणासाठी अदाणी सिमेंटच्या प्रतिबद्धतेचा ठोस पुरावा आहे. आम्ही क्रेडाईसोबत हातमिळवणी करून भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात जागतिक दर्जाचे सिमेंट उत्पादने आणि ग्रीन काँक्रीट सोल्यूशन्स यांचा स्वीकार गतीने वाढवू इच्छितो. ही भागीदारी आमच्या ‘ग्रीन आणि स्मार्ट शहरांचा’ दृष्टीकोन साकारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे – जिथे अदाणी सिमेंटचे तांत्रिक कौशल्य आणि क्रेडाईचे प्रत्यक्ष अनुभव एकत्र येऊन अधिक मजबूत, सुरक्षित आणि शाश्वत रचना घडवतील. आम्ही क्रेडाई सदस्यांसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहोत आणि आम्ही आमच्या दर्जेदार बांधकाम साहित्य तसेच संशोधन आणि विकास क्षमतांद्वारे त्यांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत, जेणेकरून आम्ही घर खरेदीदारांना उत्तम मूल्य देऊ शकू आणि भारताच्या प्रगतीच्या प्रवासात आपले योगदान देऊ शकू.”