
no images were found
ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला
सर्वोच्च न्यायालयात होणारी ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार होती. या पाच न्यायमूर्तींपैकी आज न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नाहीत. यामुळे आजची होणारी सुनावणी लांबणीवर गेली असून ही सुनावणी १४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार असून ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत कोणता निर्णय होऊ शकलेला नाही.