no images were found
हस्तशिल्प कारागिरांसाठीचे चर्चासत्र संपन्न
कोल्हापूर : सोमवार (दि. 9) रोजी हस्तशिल्प सेवा केंद्र कोल्हापूर वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत विकास आयुक्त हस्तशिल्प कार्यालयाच्या वतीने हस्तशिल्प कारागिरांसाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे यांनी या सत्राचे उद्घाटन केले आणि स्थानिक हस्तकला उत्पादकांना जागतिक पातळीवर जाण्यावर भर दिला. स्वतःचे ब्रँड तयार करण्यासाठी कारागिरांना त्यांनी प्रोत्साहनही दिले. श्री चंद्रशेखर सिंग सहाय्यक संचालक हस्तशिल्प सेवा केंद्र यांनी DC(H) च्या विविध योजनांची माहिती दिली.
श्री आशुतोष विलास जाधव सहाय्यक महाव्यवस्थापक नाबार्ड यांनी कारागिरांसाठी नाबार्डच्या विविध योजनांची माहिती दिली.
श्री गणेश गोडसे जिल्हा व्यवस्थापक प्रमुख यांनी बँकेच्या सुविधा व योजनांची माहिती दिली. निफ्ट मुंबईचे संचालक श्री पवन गोडीवाला यांनी हस्तकला क्षेत्रातील डिझाईनची नावीन्यपूर्ण माहिती दिली. यांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता झाली.
श्री रितेश कुमार प्रशिक्षण अधिकारी हस्तशिल्प सेवा केंद्र यांनी सर्व मान्यवर आणि हस्तशिल्प कारागिरांचे आभार मानले. कार्यक्रमात यावेळी श्री नितीन कुलकर्णी प्रो. निफ्ट मुंबई, श्री नितीन कुमार जेम फॅसिलिटेटर महाराष्ट्र राज्य, श्री वैभव भावसार ई मार्केटिंग तज्ञ, श्री अनिल कुमार आणि श्री पवन कुमार एचएससी कोल्हापूरचे कर्मचारी इतर सदस्य उपस्थित होते.