no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये बापोदाराने चिराग आणि पन्नू यांच्यात आणले वितुष्ट
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ ही मालिका गहन आशावाद आणि समाधानकेंद्रित दृष्टिकोणाच्या माध्यमातून आयुष्यातील आव्हानांना तोंड देणाऱ्या धीरोदात्त पुष्पाची (करुणा पांडेय) कथा आपल्याला सांगते. मागील काही भाग पुष्पाची दोन मुले – चिराग (दर्शन गुर्जर) आणि अश्विन (नवीन पंडिता) यांच्यातील वाढत्या तणावाची साक्ष देणारे होते. चिरागला जेव्हा अश्विनच्या टेंडर घोटाळ्याची माहिती होते, तेव्हा ही परिस्थिती उद्भवलेली असते. आईच्या सल्ल्यानुसार पुढे जात चिराग सत्याची बाजू घेतो आणि त्याच्या भावाविरुद्ध सरकारी खटला चालवण्यास सांगतो.
मालिकेतील आगामी भागांत पुष्पावरील संकटे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या गुंतागुंतीच्या परिस्थितील आपल्या पद्धतीने मार्ग काढण्याचा ती प्रयत्न करत असते. या संकटांत आणखीच भर पडते जेव्हा चिरागने आपल्याला जिन्यांवरून खाली ढकलल्याचे नाटक बापोदरा करतो. दुर्दैवाने बापोदराची मुलगी आणि चिरागची पत्नी पन्नू त्यांना खाली पडताना पाहते अन् आपल्या वडिलांनी केलेल्या आरोपावर तिचा विश्वास बसतो. चिराग आणि पन्नू यांच्यात वितुष्ट आणण्यात बापोदरा यशस्वी होतील का? या असामान्य परिस्थितीतून पुष्पा कशाप्रकारे मार्ग काढतील?
मालिकेत चिरागची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शन गुर्जर म्हणाला की, “टेंडर घोटाळ्यातील आपल्या भावाच्या सहभागाचा प्रमुख साक्षीदार म्हणून चिराग हा आधीच मानसिकदृष्ट्या एका भावनांच्या मोठ्या हिंदोळ्यावर झुलत आहे. आता बापोदरा यांनी चिरागने आपल्याला जिन्यातून खाली ढकललयाचा आरोप करत कुटुंबात आणखीच गोंधळ घातला आहे. यामुळे चिराग आणि त्याची पत्नी पन्नू यांच्यातील संबंधांत तणाव निर्माण केला आहे. चिराग आणि कुटुंबासाठी पुढची वाट वाटतेय तितकी सोपी असणारी नाही आहे. या अगणित भावनांच्या जंजाळात माझा वाटा साकारण्यासाठी आता अधिक वेळ प्रतीक्षा करू शकत नाही. आगामी भागात प्रेक्षकांना अनेक वळणे अन् कलाटण्या पाहण्याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्याचवेळी त्यांचा प्रतिसाद पाहण्यासाठी मलाही मोठी उत्सुकता लागलेली आहे.”