Home सामाजिक जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

11 second read
0
0
29

no images were found

जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.81 टिएमसी पाणीसाठा असून राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- शिरगांव, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, व खडक कोगे.

कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे व करंजफेण.
हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, सुळेरान, चांदेवाडी, दाभीळ, ऐनापूर व निलजी.
घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानर्डे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.
वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी व
शेणगांव.
कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली, सांगशी व असळज
वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली व खोची
कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे व सरुड पाटणे.
धामणी नदीवरील- सुळे व पनोरे
तुळशी नदीवरील- बीड
ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे व न्हावेली
दुधगंगा नदीवरील –दत्तवाडी व सुळकुळ असे 69 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 1.25 टिएमसी, वारणा 20.93 टिएमसी, दूधगंगा 8.62 टिएमसी, कासारी 1.84 टिएमसी, कडवी 1.60 टिएमसी, कुंभी 1.83 टिएमसी, पाटगाव 2.07 टिएमसी, चिकोत्रा 0.60 टिएमसी, चित्री 0.76 टिएमसी, जंगमहट्टी 0.53 टिएमसी, घटप्रभा 1.56 टिएमसी, जांबरे 0.82 टिएमसी , आंबेओहोळ 0.53 टिएमसी, कोदे (ल.पा) 0.21 टिएमसी असा आहे.
  तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 34.6 फूट, सुर्वे 33 फूट, रुई 61.9 फूट, इचलकरंजी 58, तेरवाड 51 फूट, शिरोळ 42.6 फूट, नृसिंहवाडी 39.10 फूट, राजापूर 29.10 फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 14.3 फूट व अंकली 19.4 फूट अशी आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…