no images were found
आयआयएफएल उभारणार बाँड्सद्वारे १,००० कोटी रुपये
कोल्हापूर, : भारतातील सर्वात मोठ्या नॉन-बँकिंग मायक्रोफायनान्स कंपन्यांपैकी एक असलेली आयआयएफएल समस्ता फायनान्स व्यवसाय वृद्धी आणि भांडवल वाढ करण्याच्या उद्देशाने सुरक्षित रोख्यांच्या (बाँड्स) पहिल्या सार्वजनिक विक्रीतून १००० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारणार आहे. हे रोखे १०.५० टक्क्यांपर्यंत परतावा आणि उच्च दर्जाची सुरक्षितता ऑफर करतात. ही रोखेविक्री ४ डिसेंबर २०२३ रोजी सुरू होईल आणि १५ डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल. आयआयएफएल समस्ता ही ७३०६६ कोटी रुपयांची कर्ज मालमत्ता व्यवस्थापित करणाऱ्या आयआयएफएल फायनान्सचा एक भाग आहे, जी भारतातील सर्वात मोठी रिटेल-केंद्रित एनबीएफसी आहे.
आयआयएफएल समस्ता फायनान्स ८०० कोटींपर्यंतचेओव्हर-सबस्क्रिप्शन राखत ग्रीन-शू पर्यायासह २०० कोटी रुपयांचे रोखे (एकूण रु. १००० कोटी) जारी करेल. आयआयएफएल समस्ता रोखे हे ६० महिन्यांच्या कालावधीसाठी १०.५० टक्के वार्षिक दराने सर्वोच्च कूपन दर प्रदान करतात. हे एनसीडी २४ महिने, ३६ महिने आणि ६० महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. व्याज पेमेंटची वारंवारता प्रत्येक सिरिजसाठी मासिक आणि वार्षिक आधारावर उपलब्ध आहे.
आयआयएफएल समस्ता फायनान्सचे एमडी आणि सीईओ श्री. व्यंकटेश एन म्हणाले, “आयआयएफएल समस्ता फायनान्सचे सुमारे १५०० शाखांच्या माध्यमातून संपूर्ण भारतात मजबूत भौतिक अस्तित्व आहे. हे एका चांगल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओद्वारे अल्पसंख्याक आणि सेवा न मिळालेल्या लोकांच्या, प्रामुख्याने वंचित पार्श्वभूमीतील महिला उद्योजकांच्या पत गरजा पूर्ण करते. उभारलेल्या निधीचा वापर अशा अधिक ग्राहकांची क्रेडिट मागणी पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसायाच्या वाढीला चालना देण्यासाठी केला जाईल.”
आयआयएफएल समस्ता फायनान्स आशा महिलांना नाविन्यपूर्ण आणि परवडणारी आर्थिक उत्पादने प्रदान करत असते, ज्यांची सदस्य म्हणून नावनोंदणी झाली आहे आणि बँक सुविधा उपलब्ध नसलेल्या वर्गातील महिलांना संयुक्त दायित्व गट म्हणून संघटित केले आहे. अशा गटांमध्ये भारतातील ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील शेतकरी, शेतमजूर, भाजीपाला आणि फूल विक्रेते, कापड व्यापारी, शिंपी, कारागीर, तसेच घरगुती आणि औद्योगिक कामगारयांचा समावेश असतो.
आयआयएफएल समस्ता फायनान्सकडे सप्टेंबर २०२३ अखेरीस एकूण १२,१९६ कोटी रुपयांची कर्ज मालमत्ता व्यवस्थापनाखाली होती आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत तिला २३३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आयआयएफएल समस्ता फायनान्सचे देशभरात १४८५ शाखांचे जाळे पसरलेले आहे आणि त्यांच्याकडे एकूण १४२८६ कर्मचारी कार्यरत आहेत.आयआयएफएल समस्ता फायनान्सने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने एनपीएची पातळी कमी ठेवली आहे आणि मालमत्तेच्या चांगल्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे कायम ठेवले आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत तिचे एकूण एनपीए लोन बुकच्या २.११ टक्के आणि निव्वळ एनपीए ०.५७ टक्के आहे. जेएम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या रोखे विक्रीचे प्रमुख व्यवस्थापक आहेत. गुंतवणूकदारांना तरलता प्रदान करण्यासाठी हे एनसीडी बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर(एनएसई) सूचीबद्ध केले जातील. आयआयएफएल बाँड्स रु. १००० च्या दर्शनी मूल्यावर जारी केले जातील आणि सर्व श्रेणींमध्ये अर्जाचा किमान आकार रु.१०,००० इतका असेल.