Home सामाजिक हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने नवीन ग्रीनफील्ड कारखान्यासाठी केला भूमिपूजन 

हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने नवीन ग्रीनफील्ड कारखान्यासाठी केला भूमिपूजन 

13 second read
0
0
24

no images were found

हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने नवीन ग्रीनफील्ड कारखान्यासाठी केला भूमिपूजन 

 

मुंबई – भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने (एचसीसीबी) महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील एमआयडीसी लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील आगामी ग्रीनफील्ड कारखान्यासाठी भूमिपूजन समारंभ आयोजित केला. या समारंभात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि माननीय उद्योगमंत्री श्री. उदय सामंत उपस्थित होते. एचसीसीबीचे सीईओ जुआन पाबलो रॉड्रिग्ज यांच्यासह कंपनीचे अनेक वरिष्ठ अधिकारीही समारंभात उपस्थित होते. 

हा कारखाना फेब्रुवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे आणि त्यामुळे एचसीसीबीच्या उत्पादन क्षमतांमध्ये मोठी वाढही होणार आहे. त्याचप्रमाणे शाश्वत विकासाप्रती कंपनीही बांधिलकीही या कारखान्यामुळे अधिक दृढ होणार आहे. १,३८७ कोटी रुपयांच्या अपेक्षित गुंतवणूकीतून उभारला जाणारा हा कारखाना ८८ एकर जागेत असेल. हा कारखाना ३५० व्यक्तींसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असेही अपेक्षित आहे. 

महाराष्ट्रातील समृद्ध परिसरात स्थापन केला जाणारा हा कारखाना वसिष्ठी नदीतील पाण्याचा वापर करणार आहे. एमआयडीसी पाइपलाइनद्वारे कारखान्याला हे पाणी पुरवले जाईल. या धोरणात्मक निर्णयातून एचसीसीबीची पर्यावरण शाश्वततेप्रती आणि कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनाप्रती बांधिलकी अधोरेखित होते. 

एचसीसीबी महाराष्ट्रात अनेक समुदाय उपक्रमही राबवणार आहे. शैक्षणिक पायाभूत सुविधा, पाण्याचे एटीएम्स, शाश्वत शेती आणि समुदाय संवाद केंद्र यांसारख्या उपक्रमांमुळे ८१,००० जणांच्या आयुष्यांवर सकारात्मक परिणाम होणार आहेत. लोटे भागातील १०,००० जणांना या उपक्रमांचा थेट लाभ होणार आहे. एचसीसीबी १४ गावांतील ३,००० स्त्रियांना डिजिटल व आर्थिक कौशल्यांनी सुसज्ज करणार आहे, तर २,५०० तरुणांना विक्री व मार्केटिंगचे प्रशिक्षण देणार आहे. 

महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेजी म्हणाले, “हा केवळ औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा नाही, तर औद्योगिक वाढ व सामाजिक कल्याण यांतील समन्वयात्मक संबंध जोपासण्याप्रती महाराष्ट्र सरकारची बांधिलकी यातून दिसून येते. आपण आपला औद्योगिक व सामाजिक विकासाचा अजेंडा सातत्याने पुढे नेत राहणार असल्यामुळे एचसीसीबीसारख्या कंपन्या निभावत असलेल्या भूमिकेचे मोल महाराष्ट्र सरकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला शाश्वत व न्याय्य वाढीचा दीपस्तंभ करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ मिळत आहे.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…