no images were found
एण्ड टीव्हीची नवीन मालिका ‘अटल‘ – श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या लहानपणीच्या कथांवर आधारित
भारताच्या इतिहासात अनेक पंतप्रधान परिवर्तनवादी नेते म्हणून उदयास आले आहेत, त्यांनी त्यांचा उत्तम दृष्टिकोन व संकल्पनेसह देशाला निर्णायक क्षणांमधून मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामुळे देशाच्या भविष्याला आकार मिळाला आणि जागतिक स्तरावर देश अग्रस्थानी पोहोचण्यास मदत झाली. धोरणात्मक दृष्टिकोन व निर्णायक कृतींच्या माध्यमातून या नेत्यांनी इतिहासात आपली नावे कोरली आणि अतूट वारसा निर्माण केला, ज्यामधून अभूतपूर्व यश व प्रगतीचे युग सुरू झाले. असेच एक प्रमुख नेते म्हणजे दिवंगत अटलबिहारी वाजपेयी.
अटल बिहारी वाजपेयी हे एक प्रभावशाली राजकारणी होते आणि भारतीयांनी त्यांचा वारसा मोठ्या आदराने जपला आहे. एण्ड टीव्ही आपली नवीन मालिका ‘अटल’च्या माध्यमातून त्यांच्या बालपणाबाबत न सांगण्यात आलेल्या पैलूंना सादर करण्यास सज्ज आहे. युफोरिया प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित ही मालिका भारताच्या भवितव्याला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या नेत्याच्या सुरूवातीच्या काळाला दाखवणार आहे. भारतातील ब्रिटीश वसाहतवादी राजवटीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका अटलबिहारी वाजपेयी यांच्या बालपणाला सादर करेल. तसेच घटना, विश्वास व आव्हानांवर प्रकाश टाकेल, ज्यामुळे ते महान नेते ठरले. या मालिकेचे कथानक त्यांचे विश्वास, मूल्य व विचारसरणीवर मोठा प्रभाव टाकलेल्या त्यांच्या आईसोबतचे त्यांच्या नात्याला दाखवेल. एकीकडे भारत ब्रिटीश राजवटीत गुलामगिरीचा सामना करत होता तर दुसरीकडे अंतर्गत वादविवाद व संपत्ती, जात, भेदभाव याला तोंड देत होता. अटल यांच्या आईने अखंड भारताची संकल्पना केलेले स्वप्न हे त्यांनी मनापासून जपले होते. मालिकेचे कथानक विनम्र कुटुंबातील प्रामाणिक मुलगा आणि भारताचे महान नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रेरणादायी कथा सादर करते.
नवीन मालिका ‘अटल’बाबत एण्ड टीव्हीचे बिझनेस हेड विष्णू शंकर म्हणाले, ”एण्ड टीव्हीमध्ये आम्ही प्रेक्षकांशी संलग्न होणारे आणि संबंधित व अर्थपूर्ण कथानकाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणारे कन्टेन्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आमची नवीन मालिका ‘अटल’ श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरूवातीच्या काळाला सादर करणारी लक्षवधेक कथा आहे. एक प्रख्यात नेता, कवी व वक्ता म्हणून त्यांची प्रतिमा सर्वांना माहित आहे, पण त्यांच्या बालपणाबाबत बहुतेकांना माहित नाही. या मालिकेचे कथानक त्यांच्या सुरूवातीच्या काळाला आणि त्यांचे विश्वास व मूल्यांना आकार दिलेल्या, तसेच उत्तम व्यक्ती व नेता बनण्यास प्रेरित केलेल्या आव्हानांना दाखवते. आम्हाला प्रेक्षकांसमोर त्यांची गाथा सादर करण्यास सन्माननीय वाटत आहे. आम्ही आशा करतो की, प्रेक्षक मालिका पाहण्याचा आनंद घेण्यासह त्यामधून प्रेरित होतील.”
मालिकेचे निर्माता, युफोरिया प्रॉडक्शन्सचे आरव जिंदाल म्हणाले, ”बुद्धी व वक्तृत्वाचे दूरदर्शी नेतृत्व श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय राजकारणावर निरंतर वारसा निर्माण केला. राजकीय क्षमता, वैयक्तिक मोहकता आणि देशाच्या कल्याणाप्रती अविरत कटिबद्धतेसह ते भारताच्या इतिहासामधील आदरणीय नेते आहेत. वाजपेयी यांनी राजकीय क्षेत्राला नवीन आकार दिला, राजकारणामध्ये आपल्या मूळ संस्कृतीची भर केली. आर्थिक विकासाला चालना देणारे राजकारणी असलेल्या त्यांनी अनेक भेदभाव दूर केले आणि लोकांची प्रशंसा मिळवली. त्यांच्या निर्णयांमुळे भारताने जागतिक स्तरावर अग्रणी दिशेने वाटचाल सुरू केली, ज्यामध्ये त्यांची प्रगल्भ बुद्धी व दूरदृष्टी समाविष्ट होती. वाजपेयी यांचे सर्वसमावेशक नेतृत्व, प्रगती व एकतेला चालना देण्याचा दृष्टिकोन आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, जो आजही राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा आहे. आमची मालिका ‘अटल’ आजच्या पिढीला त्यांचा कालातीत वारसा आणि करिष्माई व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते, तसेच त्यांच्या बालपणीच्या न सांगण्यात आलेल्या गोष्टींना सादर करते.”