
no images were found
शोध मोहिम राबविणेबाबत वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कस यांना प्रशिक्षण
कोल्हापूर :- झिका व्हायरस, डेंग्यू, चिकनगुनिया, कुष्ठरुग्ण व क्षय रुग्ण शोध मोहिम राबविणेच्या अनुषंगाने आज केशवराव भोसले नाटयगृह येथे महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कस यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये झिका व्हायरस, डेंग्यू, चिकनगुनिया या आजाराबाबत नागरीकांमध्ये करावयाची जनजागृती तसेच सर्व्हेक्षणाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. आरोग्य विभागामार्फत भागामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरात साचलेल्या निकामी, निरुपयोगी वस्तू नष्ट करुन परिसर स्वच्छ करावा, परिसर अभियांत्रिकी डबकी बुजविणे, डबकी वाहती करावीत, इमारतीवरील व जमिनीत पाण्याच्या टाक्यांमध्ये डास होऊ नये याकरीता घट्ट झाकण बसवावित, खिडक्यांना, व्हेंट पाईपला डास प्रतिबंधक जाळया बसवाव्यात या बाबींची जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर ज्या ठिकाणी डास उत्पत्ती होते त्या स्थानात गप्पी मासे सोडावेत. यासाठी महापालिकेच्या 8 नं. शाळेसमोरील गुलमर्ग अपार्टमेंट, कदम खण जुना वाशी नाका, रंकाळा मेन तलाव, क्रेशन खण चौक, बेलबाग परिसर मंगेशकर नगर खण, टाऊन हॉल गार्डन, रंकाळा स्टँन्ड मागे ईनामदार विहीर, देशपांडे हॉस्पिटल समोर तळघर हरीमंदीर दुधाळी परिसर, नानी पार्क पितळी गणपीत मंदीर जवळ ताराबाई पार्क, वॉटर पार्क रमणमळा, महावीर गार्डन कलेक्टर ऑफिस समोर, न्यु शाहुपूरी घोरपडे गल्ली संयोगीता अर्पामेंट तळघर, कोठीतीर्थ तलाव, रुईकर कॉलनी नर्सरी विहीर, टेंबलाईवाडी गणेश मंदीर जवळ येथील गप्पी मासे या केंद्रातून मोफत मिळतात. ते नागरीकांनी घ्यावेत याबाबत आवाहन करण्याच्या सचूना दिल्या.
महानगरपालिका मध्ये दि. 20 नोव्हेंबर 2023 पासून संयुक्त कुष्ठरुग्ण व सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान मोहिम दि.20 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2023 या कालावधीत शहरामध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान प्रत्यक्ष घरोघरी जाऊन घरामधील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग आजारासाठीची शारीरिक तपासणी आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच, आरोग्य कर्मचारी व वैद्यकिय अधिकारी या मोहिमेचे पर्यवेक्षण करणार आहेत. या मोहिमे दरम्यान जोखीम ग्रस्त शहरी भागातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून आज अखेर शहरातील 190575 नागरीकांचे सर्वेक्षित करण्यात आलेले आहे. या मोहिमे दरम्यान 42350 घरातील नागरिकांची 121 पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार असून, 26 पर्यवेक्षक सदर मोहिमेचे सहनियंत्रण करणार असलेची माहिती आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी दिली.
उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी ही मोहिम यशस्वीपणे राबविणेच्या सूचना यावेळी सर्वांना दिली. यावेळी डॉ.पालेकर यांनी कुष्ठरुग्ण शोध अभियाना संदर्भात सविस्तर माहिती देऊन डॉ.दळवी मॅडम यांनी सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेबद्दल सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणसाठी प्रमुख उपस्थिती डॉ. पालेकर, कुष्ठरोग विभाग, डॉ. अमोलकुमार माने, आरसीएच नोडल ऑफिसर, डॉ. दळवी, शहर क्षयरोग नियंत्रण विभाग, महानगरपालिकेतील सर्व वैद्यकिय अधिकारी, जीएनएम, एएनएम, आशा सेविका, क्षयरोग विभागातील व कुष्ठरोग विभागातील कर्मचारी उपस्थित होते.