
no images were found
सीमाभागात कौशल्यावर आधारित उपकेंद्र उभारणीसाठी शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या माध्यमातून सीमा भागात असणाऱ्या चंदगड,गडहिंग्लज ,आजरा या तालुक्यातील युवक-युवतीसाठी विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित एक उपकेंद्र निर्माण करून या भागातील युवक-युवतीसाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम निर्मिती करून रोजगारास /व्यवसायास चालना मिळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
या निमित्ताने आज चंदगड तहसील कार्यालय येथे तालुक्यातील प्रमुख अधिकरी वर्ग व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य यांची महत्वपूर्ण बैठक या विषयावर झाली.प्रामुख्याने हे तालुके जिल्हा कार्यक्षेत्रापासून १०० किमी अंतरावर आहे त्यामुळे या भागातील बहुतांशी युवक युवती आपले शिक्षण अपूर्ण सोडून नोकरीच्या निमित्ताने पुणे,मुंबई,गोवा या ठिकाणी स्थलांतर होतात.या तालुक्याला नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली आहे पण या माध्यमातून आपण चांगल्याप्रकारे कसा व्यवसाय सुरु करू शकतो याचे प्रशिक्षण यांना मिळत नाही. तालुका स्वयंपूर्णतेकडे जावा,कोणत्याही विध्यार्थाला २०किमी च्या पुढे शिक्षण घेण्यासाठी जाऊ लागू नये यासाठी विद्यापीठ जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी तयार आहे .बांबू व्यवसाय,काजू प्रकिया व्यवसाय ,नाचणी उत्पादक यांचे नामवंत ब्रांड आपण या माध्यमातून निर्माण करू शकतो.असे विचार व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्य सदस्य मा.सिद्धार्थ शिंदे यांनी या बैठकीमध्ये मांडले.रोजगारनिर्मिती होणे तसेच या भागातील व्यावसायिक निर्माण व्हावे हा मुख्य हेतू आमचा आहे असे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.अमरसिंग रजपूत व अड स्वागत परुळेकर यांनी व्यक्त केले.
लवकरच येथील युवक युवतींना काय हवे आहे इथल्या लोकांना काय हवे आहे या सर्व बाबींचा विचार करून तसे अभ्यासक्रम तयार करून व्यावसायिक व रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमानात केली जाईल. या बैठकीला चंदगड चे नायब तहसीलदार मा.अशोक पाटील साहेब ,कृषी अधिकारी माने साहेब,मंडल अधिकारी मा.सलगर साहेब, तलाठी खटावकर साहेब, शिवाजी विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.आर.जी.पवार ,कौशल्य विकास अधिकारी प्रमोद कांबळे उपस्थित होते,