
no images were found
संशोधन आधारित अभ्यासातून दर्शविले बदाम सेवनाचे आरोग्यदायी फायदे
पुणे-न्यूट्रिशन आणि डायटेटिक्सच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने, सिंबायोसिस स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स आणि न्यूट्रिशनल सायन्सेस आणि अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने बदाम सेवनाच्या फायद्यांवर आधारित एक शैक्षणिक सत्र आयोजित केले. न्यूट्रिशन आणि वेलनेस कन्सल्टंट शीला कृष्णस्वामी यांनी हे सत्र घेतले, ज्यामध्ये त्यांनी अलिकडच्या तीन संशोधन अभ्यासांवर प्रकाश टाकला. या सत्रामध्ये सिंबायोसिस स्कूल ऑफ क्युलिनरी आर्ट्स आणि न्यूट्रिशनल सायन्सेस चे संचालक आणि प्राध्यापक अतुल ए. गोखले आणि त्यांच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या टीमने उपस्थिती लावली. हे संशोधन अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाच्या सहकार्याने डॉ. मार्क कर्न, डॉ. ऑलिव्हर सी. विटार्ड आणि डॉ. अनुप मिश्रा यांनी केले. या संशोधनातून असे दिसून आले की दररोजच्या आहारात बदामांचा समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामध्ये प्रीडायबेटीसचे व्यवस्थापन आणि मसल्स रिकव्हरी(स्नायू पुन्हा बळकट होण्यास) यामधील भूमिका स्पष्ट करण्यात आली.
शीला कृष्णस्वामी यांनी प्रीडायबेटीस असलेल्या व्यक्तींसाठी दररोज मूठभर बदाम सेवन केल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होतो, याबाबत माहिती दिली. तसेच, त्यांनी दोन वेगवेगळ्या अभ्यासांद्वारे बदामांच्या मसल्स रिकव्हरीच्या भूमिकेवरही चर्चा केली.
सत्राच्या सुरुवातीला, त्यांनी सॅन दिएगो स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. मार्क कर्न, पीएच.डी., आरडी, सीएसएसडी यांच्या संशोधनाच्या निष्कर्षांवर चर्चा केली. या अभ्यासात असे आढळले की आठ आठवडे दररोज दोन औंस (सुमारे 56 ग्रॅम) बदाम सेवन केल्याने आरोग्यदायी किंवा किंचित जाड व्यक्तींमध्ये व्यायामानंतर होणाऱ्या वेदना कमी झाल्या, स्नायूंची ताकद सुधारली आणि स्नायूंच्या नुकसानीवर मर्यादा आल्या. याशिवाय, स्नायूंच्या थकव्यावरही याचा सकारात्मक परिणाम झाला, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या व्यायाम दिनचर्येत सातत्य ठेवणे सोपे झाले.
त्याचप्रमाणे, किंग्स कॉलेज लंडनमधील वरिष्ठ व्याख्याते डॉ. ऑलिव्हर सी. विटार्ड यांच्या संशोधनात असे नमूद करण्यात आले की आठ आठवड्यांसाठी बदाम स्नॅक म्हणून सेवन केल्याने स्नायूंच्या वेदना कमी होतात आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेला मदत होते. हे संशोधन मध्यमवयीन आणि किंचित जड व्यक्तींसाठी व्यायामानंतरच्या रिकव्हरीसाठी बदाम फायदेशीर ठरू शकतात, यावर प्रकाश टाकते.
मसल्स रिकव्हरीबाबत बोलताना शीला कृष्णस्वामी म्हणाल्या, “सक्रिय राहणे आणि संतुलित आहार घेणे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही काय खाता, याचा तुमच्या शरीराच्या व्यायामानंतरच्या रिकव्हरीवर मोठा प्रभाव पडतो. बदाम हे नैसर्गिकरित्या प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे व्यायामाच्या आधी किंवा नंतर स्नॅक म्हणून सर्वोत्तम पर्याय आहेत. ते स्नायूंच्या दुरुस्तीला मदत करतात आणि रिकव्हरीला सहाय्य करतात. तसेच, बदामांमध्ये 15 महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात, ज्यात हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट आहेत, जे एकूण आरोग्यास मदत करतात. संशोधनातून असेही स्पष्ट झाले आहे की बदाम स्नायू पुनर्बलनास चालना देऊ शकतात, त्यामुळे सक्रिय जीवनशैली असलेल्या प्रत्येकासाठी ते एक स्मार्ट पर्याय आहेत.”