Home राजकीय पुण्यातील मनसेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; ५० कार्यकर्त्यांचे राजीनामे

पुण्यातील मनसेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; ५० कार्यकर्त्यांचे राजीनामे

4 second read
0
0
37

no images were found

पुण्यातील मनसेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी; ५० कार्यकर्त्यांचे राजीनामे

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचाप्रचार अंतिम टप्प्यात असताना मविआच्या रविंद्र धंगेकर यांचा प्रचार केल्यामुळं मनसेनं सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती.  त्यानंतरही मनसेच्या ५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे.

         भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची माहिती समोर आली. रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम अशी या सात जणांची नावं असून त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. पक्षाच्या भूमिकेमुळे अस्वस्थ असलेल्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून हून निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…