
no images were found
माधुरीचा पती आणि एक्स बॉयफ्रेंड संजय दत्त आले आमने-सामने!
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई आणि त्यांच्या पत्नी मुक्ता घई यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत एका डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं.
या पार्टीत संजय दत्त, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित आणि अनुपम खेर पोहोचले होते. विशेष म्हणजे माधुरीचे पती श्रीराम नेनेही या पार्टीत सहभागी झाले होते.
श्रीराम नेने यांनी इंस्टाग्रामवर या पार्टीमधील फोटो शेअर केले आहेत. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कमेंट्सचा पाऊस पडला आहे. याचं कारण या फोटोत माधुरी आपले पती श्रीराम नेने आणि एक्स बॉयफ्रेंड संजय दत्त यांच्यासह एकत्र दिसत आहे.
माधुरी दीक्षित आणि संजय दत्त हे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडींमध्ये गणलं जातं. एक काळ होता जेव्हा या दोघांच्या अफेअर्सच्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होत्या. पण त्यांचं हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. संजय दत्त जेलमध्ये गेल्यानंतर माधुरीने सर्व नाती तोडली होती. यानंतर अनेक वर्षांनी ‘कलंक’ चित्रपटाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले होते.
दरम्यान हे फोटो पाहिल्यानंतर चाहते ‘खलनायक’ चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे का? अशी विचारणा चाहत करत आहेत. ‘गदर 2’ चित्रपटाप्रमाणे खलनायकचाही सिक्वेल येईल अशी शंका चाहते व्यक्त करत आहेत.