
no images were found
परीख पुलाऐवजी पर्यायी मार्ग म्हणून उडडाणपूल तसेच भुयारी मार्ग प्रस्तावित
कोल्हापूर : राजारामपुरी व मध्यवर्ती बस स्थानक परिसर रेल्वे मार्गामुळे दुभागले गेलेला आहे. या दोन्ही परिसरास जोडणा-या परीख पुलाऐवजी पर्यायी मार्ग म्हणून उडडाणपूल तसेच भुयारी मार्ग करणसाठी फिजीबीलिटी रिपोर्ट तयार करुन प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी अंदाजित रक्कम रु.86 कोटी निधीची महापालिकेला आवश्यकता असून हा निधी शासनाकडे मागणी करण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून सुरु आहे.
शहरातून जाणा-या रेल्वे मार्गावरील परीख पूल येथील राजारामपुरी व मध्यवर्ती बस स्थानक परीसर यांना जोडणा-या परीख पुलाऐवजी या ठिकाणी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी परीख पुलाखालील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी अथवा अन्य पर्याय देणेबाबत पवडी विभागामार्फत Structural Strengthening, Widening of Existing Parikh Pool व Two Way Underpass and over pass at other location असे दोन पर्याय रेल्वे प्रशासनाकडे व्यवहार्यता तपासणी कामी महापालिकेकडून सादर करण्यात आले होते.
त्यानुसार रेल्वे विभागाकडून या पर्याया पैकी पर्याय क्रं.1) Structural Strengthening, Widening of Existing Parikh Pool हा पर्याय जागेवर प्रत्यक्षात करणे शक्य नसल्याने पर्याय क्रं.2) Construction of Road over Bridge at suitable location हा पर्याय योग्य असल्याचे कळविले आहे. परिख पूल हा वाहतुकीच्या वापरासाठी प्रस्तावित नसून वाहत्या पाण्यात निचरा होणे करीता करणेत आला आहे. त्यामुळे Road over Bridge करीता रेल्वे विभागाकडून कोल्हापूर महानगरपालिकेस संपुर्ण सहकार्य करण्यात येईल असे कळविले आहे.
सद्यस्थितीत परीख पुलाखालून पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांकरीता सदर ठिकाणी पादचारी उडडाणपूल प्रस्तावित करणेत आला आहे. सदर पादचारी उडडाणपुलास नुकतीच रेल्वे विभागाकडून मंजूरी प्राप्त झाली असून त्यानुसार पादचारी उडडाणपूलाकरीता आवश्यक असलेली रक्कम रु.3.88 कोटी निधी जिल्हा नियोजन समितीकडे मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात येणार आहे.