
no images were found
आपलं हिंदुत्व समजल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत- उद्धव ठाकरे
मुंबई: आपले हिंदुत्व काय आहे, हे कळल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत आहेत. सगळ्या समाजाचे लोक आपल्यासोबत आले. आता कोणाला दंगली नको, किती काळ हे करत राहणार…एकत्र आलो तर आपण जगातील सर्वांत प्रसिद्ध राज्य म्हणून पुढे येऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच कोरोनामध्ये जे काम केले ते देशात चांगले होते. पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. गुजरातमधून 90 हजार लोक इथे बोलवले आहेत. महाराष्ट्रचे कल्याण करण्यासाठी नाही तर महाराष्ट्र बळकवण्यासाठी आल्या आहेत. इथल्या भाजपच्या लोकांवर तुमचा विश्वास नाही का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. माझी तब्येत सोडा महाराष्ट्राची तब्येत चांगली राहिली पाहिजे. यावेळी जर मत फुटले तर नशीब फुटेल आणि हे सगळे आपल्या डोक्यावर बसतील, असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलं.
मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला. पण शिवसेना आणि मराठी माणूस हे कोणी तोडणार नाही. आजपर्यंत कोस्टल रोडचे वचन शिवसेनेने दिलेले आणि ते पूर्ण केले आहे. आता हे फिती कापायला येतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. आता महाराष्ट्रात बघतोय..आता चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंचं सरकारला पूर्ण वेळ काम करण्यास द्यायला पाहिजे होते. बटेंगे तो कटेंगे..असं बोलताय, पण मी मुख्यमंत्री असताना कोणाची हिंमत नव्हती, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ही मुंबई महाराष्ट्राची अस्तित्वाची आणि तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी इकडे प्रचाराला जेव्हा फिरत होते, तेव्हा मणिपूरमध्ये अत्याचार सुरु होते, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, खरंच बहिणी लाडक्या असतील तर किमान माझ्या महिलांना रेल्वे प्रवास मोफत करुन दाखवा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्यावेळी मतांमध्ये विभागणी झाली. ते यावेळी करु नका…तुमच्या आणि तुमच्या भावी पीढीला अंधारात घ्यायचं असेल तर महाझुठीला मत द्या…भविष्य प्रकाशित करायचं असेल तर मशालीला मतदान करा, असं उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना सांगितलं.