Home राजकीय पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ ?

पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ ?

10 second read
0
0
26

no images were found

पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ ?

 

        मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार बाहेर पडले आणि पक्ष व चिन्ह घेऊन ते यंदा पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विधानसभेला सामोरे जात आहेत. या कालावधीत त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून एकट्याने किल्ला लढविला असून, जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा घेऊन नेहमीप्रमाणे प्रचाराची सांगता बारामतीमध्ये केली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले.
       महायुतीत सत्तेत सहभागी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला ५८ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी ‘स्टार प्रचारक’ म्हणून अजित पवार यांनाच पळावे लागले. स्वतःच्या मतदारसंघात प्रचाराच्या शुभारंभाची सभा झाल्यानंतर अजित पवार यांना सर्व ठिकाणी फिरावे लागले.
      अजित पवार यांच्या स्थानिक स्तरावरील पक्षाच्या यंत्रणेने मात्र झोकून देत काम केले. स्थानिक सर्व आमदारांनी त्यांची सर्व शक्ती पणाला लावली; तसेच काही ठिकाणी महायुतीतील इतर घटक पक्षांनी हरतऱ्हेची मदत केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर वगळता इतर सर्व ठिकाणचे आमदार अजित पवार यांच्यासोबतच राहिल्याने सर्वांनीच तगडी प्रचार यंत्रणा राबवत कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी घेतली.
      गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रचारासाठी अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील आदी नेते सभा घेत होते. मात्र, उमेदवारांसाठी जिल्ह्यात दादांशिवाय खासदार सुनेत्रा पवार, अमोल मिटकरी, पार्थ पवार, जय पवार, तसेच रुपाली चाकणकर यांच्याशिवाय अन्य नेते फिरकू शकले नाहीत. मुंडे, भुजबळ यासारखी मुलुखमैदानी तोफ असलेल्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकून ठेवण्यात विरोधकांना यश आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…