Home शासकीय ‘मधाचे गाव पाटगांव’चा लोकार्पण सोहळा व भव्य मधपाळ मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन

‘मधाचे गाव पाटगांव’चा लोकार्पण सोहळा व भव्य मधपाळ मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन

13 second read
0
0
30

no images were found

‘मधाचे गाव पाटगांव’चा लोकार्पण सोहळा व भव्य मधपाळ मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन

 

             कोल्हापूर : जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या मार्फत मधाचे गाव पाटगांव हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून मधाचे गाव पाटगांवचा लोकार्पण सोहळा व भव्य मधपाळ मेळाव्याचे शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता, देसाईवाडी मैदान, पाटगांव येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ यांनी दिली.    जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमास विधानसभा सदस्य तथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …