no images were found
रोहित सुचांती ने केला धाडसी स्टंट
मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि लक्ष्मी (ऐश्वर्या खरे) व ऋषी (रोहित सुचांती) यांच्या जीवनाला मिळणार््या कलाटण्यांमुळे गेली दोन वर्षे ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेचा स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला असून त्यातील #RishMi या प्रमुख व्यक्तिरेखांची नावे घरोघरी पोहोचली आहेत. अलिकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की आजवर अनेक अडचणी आल्यानंतर अखेरीस ऋषी आणि लक्ष्मी यांचा विवाह पार पडतो. आता एक सुखी नवविवाहित दाम्पत्य म्हणून ते आपल्या नव्या जीवनाचा प्रारंभ करणार असतात. त्याचवेळी मलिष्का (मीरा मिश्रा) ही त्यांच्या मोटरला अपघात घडवून आणते. एक ट्रक #RishMi यांच्या गाडीला धडक देतो आणि त्यांची गाडी कड्यावरून कोसळते. याचे चित्रीकरण करीत असताना रोहित सुचांतीला दुखापत झाली.अभिनय हा असा व्यवसाय आहे की ज्यात कलाकारांना आपला नेहमीचा आरामदायक जीवनक्रम सोडून काही जोखीम पत्करावी लागते. अशी आव्हाने स्वीकारूनच त्यांची कारकीर्द वर चढते. असाच एक आव्हानात्मक प्रसंगात रोहितला कड्यावरून दरीत लोंबकळताना होता. हा प्रसंग साकारण्यापूर्वी रोहित मनातून धास्तावला होता. तरीही हा स्टंट प्रसंग स्वत:च साकारण्याचा निर्णय त्याने घेतला. हा प्रसंग साकारताना टीमने सर्व खबरदारी घेतलेली होती. तरीही या प्रसंगाचे चित्रीकरण करताना रोहितला छोटीशी दुखापत झालीच. तरीही त्याने तक्रार न करता त्या अवस्थेतही त्या प्रसंगाचे चित्रीकरण पूर्ण केले.
रोहितने जरी हा स्टंट प्रसंग साकारला असला, तरी प्रेक्षकांना आणखी एक नाट्यमय प्रसंग पाहायला मिळेल. कारण मलिष्का जेव्हा ऋषी आणि लक्ष्मीच्या गाडीला धक्का देऊन ती कड्यावरून ढकलते, तेव्हा ते दोघे या अपघातातून वाचतील का? की ऋषी आणि लक्ष्मीला ठार मारण्याच्या आपल्या कुटिल डावात मलिष्का यशस्वी होईल?