Home शैक्षणिक “समाजास गुणवान फार्मसिस्टची गरज”- सपना कुपेकर 

“समाजास गुणवान फार्मसिस्टची गरज”- सपना कुपेकर 

6 second read
0
0
75

no images were found

 

“समाजास गुणवान फार्मसिस्टची गरज”- सपना कुपेकर 

कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सुरू झालेल्या डी फार्म व बी फार्म कोर्समधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत व इंडक्शन समारंभात अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त सपना कुपेकर बोलत होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्मसीनंतरच्या विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी, त्यासाठीच्या आवश्यक पात्रता तसेच फार्मसिस्टकडून वैद्यकीय क्षेत्राच्या व समाजाच्या असलेल्या अपेक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
       यावेळी संस्थेचे विकास अधिकारी डाॅ. संजय दाभोळे यांनी काॅलेजमध्ये उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक सुविधांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा. रोहन माने यांनी काॅलेजमधील नियमित वेळापत्रक व परिक्षा पद्धती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी प्रथम वर्ष विद्यार्थी साई दाभोळे व स्वप्नाली जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
      संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. सचिन पिशवीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रिया आंबीलढोक आणि आभार प्रदर्शन वर्षा शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नीता आतकिरे यांच्यासोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

नैसर्गिकरित्‍या रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी दैनंदिन आहारामध्‍ये समाविष्‍ट केले पाहिजेत असे खाद्यपदार्थ

नैसर्गिकरित्‍या रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी दैनंदिन आहारामध् …