Home क्राईम टोमणे मारणाऱ्या पतीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून, गुप्तांगही कापलं

टोमणे मारणाऱ्या पतीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून, गुप्तांगही कापलं

0 second read
0
0
123

no images were found

टोमणे मारणाऱ्या पतीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून, गुप्तांगही कापलं
रायपूर: वारंवार काळ्या रंगावरुन टोमणे मारत असल्याने महिलेने आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात महिलेने हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी महिला संगीता सोमवानीला अटक केली आहे.
पीडित पती पत्नीला नेहमी तिच्या काळ्या रंगावरुन टोमणे मारायचा. यावरुन दोघांमध्य़े अनेकदा भांडणदेखील झालं होतं. रविवारी रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सहनशक्ती संपलेल्या संगीताने कुऱ्हाडीने पतीनवर वार केला आणि जागेवरच ठार केल. यानंतर तिने पतीचं गुप्तांगही कापलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गावकऱ्यांची दिशाभूल कऱण्यासाठी महिलेने पतीची हत्या झाल्याचा बनाव केला. पण पोलिसांनी चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. पतीच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर संगीताने त्याच्याशी लग्न केलं होतं. संगीतावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती कोल्हापूर : एसूस …