
no images were found
चित्रपटप्रेमी किमान तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन कालावधीसाठी या ऑफरचा आनंद घेऊ शकतात
भारतीयांमध्ये चित्रपटांप्रती प्रेम अविरत आहे. अनेकजण दर आठवड्याला थिएटरमध्ये नवीन चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात. आज, व्यक्ती होणाऱ्या अधिक खर्चांबाबत अधिक जागरूक बनले असताना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याच्या प्रमाणामध्ये काहीशी घट झाली आहे. भारतातील चित्रपटप्रेमींना अविश्वसनीय दरामध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद देण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्स लि. या भारतातील सर्वात मोठ्या मल्टीप्लेक्स चेनला त्यांची नवीन ऑफरिंग पासपोर्टच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. हा मासिक सबस्क्रिप्शन पास प्रदर्शित होणारा नवीन चित्रपट पाहायला न चुकण्याची इच्छा असलेल्या चित्रपटप्रेमींसाठी परिपूर्ण आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून सबस्क्रायबर्सना किफायतशीर दरामध्ये अविश्वसनीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल. सबस्क्रायबर्स फक्त ६९९ रूपयांमध्ये दर महिन्याला सोमवार ते गुरूवार जवळपास १० चित्रपट पाहू शकतात. याचा अर्थ असा की, प्रत्येक चित्रपट पाहण्याचा खर्च सुविधा शुल्क वगळून ६९.९० रूपये इतका कमी आहे. पीव्हीआर आयनॉक्सने फक्त २०,००० सबस्क्रिप्शन्ससह मर्यादित कालावधीच्या ऑफरअंतर्गत पासपोर्ट लाँच केले आहे.
अत्यंत नाविन्यपूर्ण व अभूतपूर्व ऑफरिंग्जचा भारतातील लाखो चित्रपटप्रेमींना प्रत्यक्ष व सर्वोत्तम अनुभव देण्याचा आणि चित्रपटांप्रती त्यांची आवड जपण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे. ज्यामध्ये चित्रपट पाहण्याच्या तिकिटांच्या किमतींचा अडथळा येणार नाही. तसेच या उपक्रमाचा विशेषत: कामकाजाच्या दिवसांमध्ये चित्रपट पाहण्याची सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत भारतीय प्रेक्षकांमधील थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याच्या भावनेला जागृत करण्याचा उद्देश आहे.
लाँच करण्यात आलेल्या पीव्हीआर पासपोर्टबाबत मत व्यक्त करत पीव्हीआर आयनॉक्स लि.चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्त म्हणाले, ”सिनेमा सर्वाचे लक्ष वेधून घेतो, एक मंत्रमुग्ध अनुभव, ज्याचा फक्त मोठ्या पडद्यावर आनंद घेता येऊ शकतो. पीव्हीआरमध्ये आम्ही प्रेक्षकांच्या इच्छांची पूर्तता करण्याप्रती कटिबद्ध आहोत. आम्हाला तिकिटांच्या अधिक किमतींबाबत त्यांच्याकडून ऐकायला मिळाले आहे, ज्यामुळे सिनेमा पाहण्याच्या आनंदामध्ये अडथळा येतो. ही बाब जाणून घेत आम्ही मासिक सबस्क्रिप्शन पास – पासपोर्ट अभिमानाने सादर करत आहोत, जो सिनेमॅटिक विश्वाचा आनंद घेण्यामध्ये येणाऱ्या खर्चाबाबतच्या तुमच्या समस्यांचे निराकरण करेल आणि देशभरातील प्रेक्षकांच्या चित्रपट पाहण्याच्या पद्धतीला नवीन आकार देईल. आम्हाला खात्री आहे की, आमचे ग्राहक-केंद्रित इनोव्हेशन शैलींमधील कन्टेन्टसाठी दर्शकत्व वाढवेल, ज्यामुळे ग्राहक अधिक खर्च न करता नवीन कन्टेन्टचा शोध घेण्यासह अधिक चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतील.”