no images were found
संस्कृती सुतार व अथर्व तावरेला अजिंक्यपद अरिना मोदी व प्रेम निचल उपविजेते
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :- भालचंद चिकोडे ग्रंथालय,जरगनगर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.मुलांच्या गटातील स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात घेण्यात आली.अंतिम सहाव्या फेरीत पहिल्या पटावर अग्रमानांकित इचलकरंजीच्या अथर्व तावरे ने पाच गुणासह आघाडीवर असलेल्या तृतीय मानांकित सेनापती कापशीच्या प्रेम निचल चा पराभव करून साडेपाच गुणासह अजिंक्यपद पटकाविले.प्रेम निचलला पाच गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.चौथा मानांकित इचलकरंजीच्या आराध्य ठाकूर-देसाईला पाच गुणांसह तृतीय स्थान मिळाले.साडेचार गुण मिळवणारे कोल्हापूरचे सहावा मानांकित नारायण पाटील, आठवा मानांकित अंशुमन शेवडे व बिगरमानांकित सर्वेश पोतदार यांचा टायब्रेक गुणानुसार अनुक्रमे चौथा पाचवा व सहावा क्रमांक आला. मुलींच्या गटातील स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेण्यात आली अंतिम सातव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरची अरिना मोदी व द्वितीय मानांकित नांदणीची संस्कृती सुतार या दोघींचे समान सहा गुण झाल्यामुळे सरस टायब्रेक गुणानुसार संस्कृतीला अजिंक्यपद मिळाले तर अरीनाला उपविजेतेपदावर संतुष्ट व्हावे लागले. तृतीय मानांकित नांदणीच्या सिद्धी बुबने ने पाच गुणांसह तृतीय स्थान पटकाविले तर जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वे ने साडेचार गुणासह चौथे स्थान मिळविले.कोल्हापूरची शरयू साळुंखे चार गुणासह पाचव्या स्थानी आली.
भालचंद्र चिकोडे ग्रंथालय,जरगनगर चे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी चे सदस्य श्री.राहुल चिकोडे यांचे बहुमोल सहकार्य या स्पर्धेला लाभले.भरत चौगुले,आरती मोदी,उत्कर्ष लोमटे, मनिष मारुलकर व धनंजय इनामदार यांनी स्पर्धा संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
20 ते 22 ऑक्टोंबर दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या तेरा वर्षाखालील राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवडण्यात आलेला तेरा वर्षाखालील मुला मुलींचा संघ पुढीलप्रमाणे
मुले : 1) अथर्व तावरे (इचलकरंजी) 2) प्रेम निचल (सेनापती कापसे)
मुली:- 1) संस्कृती सुतार (नांदणी) 2) अरीना मोदी (कोल्हापूर) 3) सिद्धी बुबने (नांदणी) 4) सिद्धी कर्वे (जयसिंगपूर)