no images were found
मुश्रीफ साहेब मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल-संजय पवार
कोल्हापूर(प्रतिनिधी ): मराठा समाजाप्रती चाललेल्या शासनाच्या असंवेदनशीलतेचा परिणाम म्हणून कोल्हापूर बंद च्या वेळी आम्ही निव्वळ बंद न राहता संविधानिक मार्गाने येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याच्या गाडीखाली स्वतः मराठा समाजाकरता झुकून देण्याची तयारी दाखवलेली होती .अर्थात या आंदोलनात नेत्यांनीच याची सुरुवात करून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी हा शेवटचा आणि निकराचा प्रयत्न केलेला होता. मुश्रीफ साहेब तुम्ही एका विशिष्ट समाजातले असून सुद्धा तुमचे समावेशक व सर्वाच्या प्रती कल्याणकारी धोरण पाहूनच आपल्याला कोल्हापुरातील अठरापगड जनतेने भरभरून प्रेम केलंय आणी आपल्यावर विश्वास ठेवला.परंतु नेमकं आपण त्याच लोकांच्या कळपात पुन्हा गेल्याने कदाचित वेळ मारून न्यायची सवय आपल्याला त्या लोकांची लागली असावी असा समज आत होत आहे .असे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सागितले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कुठलाही अनुचित प्रकार मराठा बांधवांच्या कडून घडू नये म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दौऱ्याच्यावेळी तुम्ही कोल्हापुरातील प्रशासनातसमवेत मराठा आंदोलन बांधवांची बैठक घेऊन मराठा समाजाची आरक्षणासंदर्भात व्यापक बैठक मुंबईत गणेश चतुर्थी पूर्वी अजितदादांचे नेतृत्वाखाली बोलवतो असा आश्वासन आम्हाला दिलं .आपल्याला सोयीस्कर आपल्याच शिष्टाईचा विसर पडला.. मुश्रीफसाहेब आपल्याकडून मराठा समाजाला ही अपेक्षा नव्हती . वस्तुतः मराठा समाजाच्या बाबतीत चालकाढू व वेळकाढू धोरण हे सातत्याने शासनाने अवलंबलेला आहे.. याची जाणीव आम्हाला आहे.. आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसणाऱ्या आंदोलनकर्त्यावर अमानुष लाठीमार करणाऱ्या प्रशासनाला व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना अद्दल घडवल्यानंतर जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर मराठा समाजाला आशा दिसत असल्या तरी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला छत्रपतींचा स्वाभिमानी मराठा शांत बसणार नाही.
मराठा आरक्षणाचा प्रश्नाबद्दल मराठा बांधव हे मंत्र्यांच्या गाडीखाली थेट झोकून द्यायला तयार आहेत आणि याची सुरुवात मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या पेक्षा मराठा आंदोलनामध्ये अग्रभागी असणाऱ्या नेत्यांच्या पासून होणार आहे .याची जाणीव आपल्याला असावी त्याचबरोबर…आपणही महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असून आपणही कोल्हापुरात नेहमी असता हे आपल्या नक्की ध्यानात असावं.. आणि या आंदोलनाची सुरुवात आपल्या गाडीपासून होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. निव्वळ आपल्या स्वार्थासाठी व आपल्यावरची वेळ टाळण्यासाठी व निव्वळ राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करणे हे सत्ताधारी राजकारणांनी सोडून द्यावं… अन्यथा पुन्हा एकदा मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर मात्र मुश्रीफ साहेब तुमचीच काय कुणाचीच ही बौद्धिक बोलघेवडी चालबाजी चालणार नाही.. त्यावेळेला मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असेल या परिस्थितीचा विचार करून होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मराठा समाजाबाबत आपण बोललेल्या सर्व गोष्टी तातडीने व त्वरित अवलंबनात आणाव्यात अन्यथा पुन्हा एकदा मराठा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही..