no images were found
कारखानदारांचीआक्रमक भूमिका-आमदार प्रकाश आवाडे
कोल्हापूर :- शेतकऱ्यांच्या पदरात जास्त पैसे कसे पडतील याचा विचार करूया. सर्वजण मिळून सरकारच्या दारात बसुया. वेगळ्या पद्धतीचे राजकारण कुणीही करू नये. तोंडाला थोडा लगाम घाला. कुठे बोलतो ? काय बोलतो, याचे भान ठेवा अशा संतप्त भावना आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन चारशे रुपये मिळायला पाहिजे, या मताशी आम्हीही ठाम आहे. पण सध्या साखरेचा ३१०० रुपये दर पाहता अडचणीचे झाले आहे. केंद्र सरकारने साखरेचा दर ३८०० रुपये केला पाहिजे. त्यासाठी आंदोलन करावे लागले तरी करू.
मागच्या आठवड्यात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने कोल्हापूर जिल्हा साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राजू शेट्टी यांनी उसाला ४०० रुपये दुसरा हफ्ता दिला नाहीतर शेतकरी कारखानदांच्या कानाखाली वाजवायलाही मागे पुढे पाहणार नाही अशी टीका केली होती. यावर आता कारखानदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
मागच्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३४ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेत हिम्मत असेल तर कानाखाली लावून दाखवा. कारखाना कार्यस्थळावरून कसे जाता आम्ही बघतो अशा शब्दात संतप्त भावना व्यक्त केली.
सरकारनेच कर्ज उभारून प्रत्येक टनाला चारशे रुपये देऊन ते थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावेत. तसा ठराव सर्वसाधारण सभेत करत असल्याचे सांगून सरकारकडून चारशे रुपये घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा आवाडेंनी दिला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक चारशे रुपये इतकी रक्कम दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजे, अन्यथा साखर कारखान्यांची धुराडी पेटवू देणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान ४०० रूपये शेतकऱ्यांना दिले नाही तर आगामी ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांना संघर्षाची भूमिका घेणे भाग पडेल, तसेच कारखानदारांनी ४०० रूपये देण्यास टाळाटाळ केली तर शेतकरी कारखानदारांच्या कानाखाली वाजवायलाही मागेपुढे बघणार नाही अशी जोरदार टीका राजू शेट्टी यांनी केली होती.