Home शासकीय संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृहातील सर्व कामे पूर्ण

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृहातील सर्व कामे पूर्ण

18 second read
0
0
39

no images were found

संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृहातील सर्व कामे पूर्ण

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृहातील विविध अडचणीं रंगकर्मी, नाटयकर्मी व नाट्य वितरक यांनी महापालिका प्रशासनाकडे मांडल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छतागृह सुरू करणे, नाटयगृहातील खुर्च्या दुरूस्त करणे, ग्रीन रूम अंतर्गत सुविधा पुरविणे, तिकीट रुम दुरुस्ती करणे, स्टेज येथे सजावटीची कामे करणे या मागण्या केल्या होत्या. सदरची कामे महापालिकेच्यावतीने कामे पुर्ण करण्यात आली आहेत.

            खासबाग मैदान पडलेल्या तटबंदीची दुरुस्ती व  संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृहातील सुविधेबाबत दि.24 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले व रंगकर्मी, नाटयकर्मी व नाटयवितरक यांनी समक्ष भेट दिली होती. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे नाटयगृह परिसरातील स्वच्छतागृहाच्या मागील पडलेल्या तटबंदीचे खर माती उठाव करण्यात येऊन मागील ड्रेनज लाईन स्वच्छ करण्यात आली आहे. या ठिकाणी पाणी पुरवठयाचीही सोय करण्यात आली असून पुरुष स्वच्छतागृहाची दुरूस्ती व नुतनीकरण करण्यात आलेले महिलांचे स्वच्छतागृह सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाटयगृहातील खराब झालेल्या खुर्च्यांची दुरूस्ती करणेत येऊन ग्रीन रुम मधील दरवाज्यांचीही दुरूस्ती, स्वच्छतागृह येथे एक्झॉस्ट फॅन व व्हेंट बसविण्यात आले आहेत. शिवाय तिकीट घर येथे पाऊस व ऊनापासून संरक्षणासाठी कॅनॉपी बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर नाटयगृहाचे छत गळती काढणेचे कामही सुरु आहे. यामधील ग्रीन रुम अंतर्गत सजावट, आरसे बदलणे, लाईट सुविधा व स्टेज वरील ड्रेपरी दुरुस्तीचे कामकाज राज्य नाटय स्पर्धा संपले नंतर सुरु करण्यात येत असलेचे नाटय वितरक यांना कळविले आहे.

            तसेच खासबाग मैदान पडलेल्या तटबंदीची दुरुस्ती करणे कामी जिल्हा नियोजन समितीची प्रशासकीय मान्यता झालेली असून निविदा प्रसिध्द करणेत आलेली आहे. लवकरच सदरचे सदरची प्रक्रिया पुर्ण करुन कामाला सुरुवात करणेत येईल

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…