no images were found
राष्ट्राच्या शाश्वत विकासाचा मजबूत दुवा बना -सुहास पालेकर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा पीढीने दर्जेदार उच्च शिक्षणाबरोबर सतत आपल्या ज्ञानात भर घालत, संवाद, संपर्क, नेतृत्व, निर्णय क्षमता विकसित कराव्यात व नवउद्योगांची निर्मिती करीत राष्ट्राच्या शाश्वत विकासाचा एक मजबूत दुवा बनावे. असे आवाहन सुहास पालेकर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र, वाणिज्य व एमबीए अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवक आणि राष्ट्रबांधणी’ या विषयावरील विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. सुहास पालेकर यांनी यावेळी ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’चळवळीचे कौतुक केले. सतेच टाटा, बजाज, गोदरेज, विप्रा, हिंदुस्तान यूनिलेवर लिमीडेट, स्वच्छहॅशसारख्या कंपन्यांच्या राष्ट्र जडणघडणीतील योगदान सांगितले. तसेच शरद बाबू, अशरफ पटेल, पूजा कौर या तरूणांनी आपल्या आसपास लोकांच्या गरजा ओळखून सुरू केलेल्या स्टार्टअपची माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी युवकांनी उद्योग क्षेत्रात नव कल्पना साकार केल्यास २०४७ चे विकसित भारतचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. एस. एस. महाजन यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन प्रा. अविनाश भाले यांनी केले. यावेळी डॉ. ए. एम. गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. दीपा इंगवले यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. पी. एस. कांबळे, प्रा. सुखदेव उंदरे, डॉ. भानारकर, प्रा. विद्यानंद खंडागळे, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. के. व्ही. मारुलकर, डॉ. अमोल महापुरे, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.