
no images were found
दूरशिक्षण केंद्रात भारतीय भाषा उत्सव निमित्त ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र व नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रसिद्ध कवी व स्वातंत्र्य सैनिक श्री.शुभ्रमनिया भारती यांच्या जयंती औचित्याने ७५ व्या भारतीय भाषा उत्सवा निमित्त दि.११ डिसेंबर रोजी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन केले असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली आहे.
या व्याख्यानामध्ये राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.रघुनाथ कडाकणे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थान संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे भूषविणार आहेत.यावेळी नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्स प्राचार्य प्रा.डॉ.एस.जे.फराटे, उपकुलसचिव डॉ.एस.एम.कुबल, श्री.सी.एस.कोतमिरे, नाइट कॉलेज मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.अरुण शिंदे उपस्थित राहणार आहेत. व्याख्यान सोमवार दि.११ डिसेंबर रोजी दुपारी ठीक ४ वा ऑनलाइन होणार असून विद्यार्थी,पालक व अभ्यागत यांनी
https://shivajiuniversity.webex.com/shivajiuniversity/j.php?MTID=m590a53f9a6 36732d0abd011b498bb525 या वेबेक्स लिंक वरून सहभागी व्हावे . असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.