Home शैक्षणिक लीडकडून शाळांसाठी अद्वितीय एआय-पॉवर्ड असेसमेंट लाँच

लीडकडून शाळांसाठी अद्वितीय एआय-पॉवर्ड असेसमेंट लाँच

4 min read
0
0
31

no images were found

लीडकडून शाळांसाठी अद्वितीय एआय-पॉवर्ड असेसमेंट लाँच

 

सातारा– लीड (LEAD) या भारतातील सर्वात मोठ्या स्‍कूल एडटेक कंपनीने आज त्‍यांच्‍या ९००० हून अधिक शाळांच्‍या नेटवर्कसाठी एआय-पॉवर्ड असेसमेंट्सच्‍या लाँचची घोषणा केली. लीडचा एआय-संचालित असेसमेंट उपक्रम भारतभरातील शाळांसोबत ११ वर्षांहून अधिक काळ काम करत मिळवलेल्‍या शैक्षणिक माहितीवर आधारित आहे. हा उपक्रम प्रत्‍येक शिक्षकाला विशिष्‍ट क्‍लासरूम गरजांनुसार मूल्‍यांकन सानुकूल व व्‍यवस्‍थापित करण्‍यास सक्षम करतो. ऑफलाइन-सक्षम व ऑटो-सिन्‍क्रोनाइज केलेल्‍या लीडच्‍या एआय-पॉवर्ड असेसमेंट्समध्‍ये प्रश्‍नाचा प्रकार, रचना व काठीण्‍य पातळी इत्‍यादींसारखे सानुकूल इनपूट्स असण्‍यासह शिक्षकांसाठी आवश्‍यकतेनुसार पुनरावलोकन व सुधारणा करण्‍याचे पर्याय आहेत. हा उपक्रम पुढील पाच वर्षांमध्‍ये २६ दशलक्ष शालेय विद्यार्थ्‍यांना प्रेरणादायी शिक्षण देण्‍याकरिता आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर बेंचमार्क केलेल्‍या अध्‍यापन पद्धतींमध्‍ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्‍याप्रती लीडच्‍या दृष्टीकोनाशी संलग्‍न आहे. आता प्रत्‍येक वर्ग व शाळेसाठी सानुकूल सक्षम केल्‍यामुळे शाळांना परीक्षेसंदर्भात सामना करावी लागणारी समस्‍या म्‍हणजेच परीक्षेचे पेपर फुटण्‍याचा धोका कमी झाला आहे.

लीडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व सह-संस्‍थापक सुमीत मेहता म्‍हणाले, ”एआय भारतातील स्‍कूल एडटेकमधील भावी फ्रण्‍टीयर आहे आणि प्रत्‍येक मुलासाठी दर्जेदार शिक्षण उपलब्‍ध व किफायतशीर करून देण्‍याच्‍या लीडच्‍या मिशनचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आमचे एआय-संचालित‍ असेसमेंट्स वर्गातील विशिष्‍ट अध्‍ययन आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍याकरिता उच्‍च दर्जाचे प्रश्‍न निर्माण करण्‍यासाठी, तसेच शिक्षकांचा वेळ वाचवत त्‍यांच्‍याकरिता महत्त्वाच्‍या असलेल्‍या विद्यार्थ्‍यांवर लक्ष केंद्रित करण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. आम्‍ही एआयचा वापर करताना शिक्षकांना वर्गामध्‍ये विद्यार्थ्‍यांच्‍या अध्‍ययनामधील आव्‍हाने ओळखण्‍यास आणि सर्व विद्यार्थ्‍यांना प्रगतीपथावर आणण्‍याकरिता प्रत्‍येक वर्गासाठी वैयक्तिकृत अध्‍ययन उपायाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत करतो.” 

पारंपारिक मूल्‍यांकन पद्धती आजच्‍या वर्गांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासंदर्भात अपुऱ्या ठरत असताना शाळांना प्रभावी मूल्‍यांकन प्रदान करण्‍याच्‍या समस्‍येचा सामना करावा लागत आहे, जे संकल्‍पनांची समज आणि विद्यार्थ्‍यांच्‍या बुद्धीकौशल्‍याचे अचूकपणे मापन करतात. मर्यादित संसाधने व वेळेचे बंधन यामुळे विशेषत: भारतातील लहान नगरे व गावांमधील शाळांमध्‍ये स्थिती अधिक बिकट झाली आहे. 

लीडचे एआय-पॉवर्ड असेसमेंट त्‍यांच्‍या टीचर अॅपमध्‍ये एकसंधीपणे समाविष्‍ट करण्‍यात आले आहे. चार रचनात्‍मक मूल्‍यांकन आणि दोन सारांशात्‍मक मूल्‍यांकन (वर्षाच्‍या शेवटी मूल्‍यांकन) यांसह उपक्रमाचा ५०००० हून अधिक शिक्षकांना फायदा होईल, जे आता त्‍यांच्‍या गरजांनुसार मूल्‍यांकन प्रकाराची निवड करू शकतात. यामुळे एकूण अध्‍यापन-अध्‍ययन अनुभवामध्‍ये वाढ होईल, तसेच शिक्षक भावी डिजिटल आव्‍हानांसाठी सुसज्‍ज होतील. क्‍लासरूम्‍ससाठी एआय-पॉवर्ड असेसमेंट्समुळे भारतातील शाळांमध्‍ये डिजिटलायझेशनला देखील गती मिळेल.

लीडची भारतातील शाळांमधील अध्‍ययन निष्‍पत्तींना प्रगत करण्‍याप्रती कटिबद्धता समकालीन पद्धतींपेक्षा पुढे आहे, जेथे २१व्या शतकातील करिअर व आव्‍हानांसाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज असलेल्‍या सर्वांगीण, तंत्रज्ञानदृष्‍ट्या पारंगत विद्यार्थ्‍यांना अधिक निपुण करण्‍यावर प्रबळ लक्ष केंद्रित आहे. लीडची इंटीग्रेटेड स्‍कूल एडटेक सिस्‍टम एनईपी २०२० शी संलग्‍न आहे आणि त्‍यामध्‍ये शाळांच्‍या सर्व विभागांसाठी सानुकूल, एआय-सक्षम ऑफरिंग्‍जचा समावेश आहे. लीडच्‍या शिक्षणाप्रती सर्वांगीण दृष्टीकोनामध्‍ये प्रत्‍येक शिक्षकाला आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर बेंचमार्क केलेल्‍या टूल्‍ससह सक्षम करण्‍यासाठी टीचर कॅपेबिलिटी सिस्‍टम, पारंपारिक क्‍लासरूम्‍सना डिजिटली-सक्षम, मल्‍टी-मोडल अध्‍यापन-अध्‍ययन क्षेत्रांमध्‍ये बदलण्‍यासाठी स्‍मार्ट क्‍लास सोल्‍यूशन्‍स, विद्यार्थ्‍यांचे अध्‍ययन व आत्‍मविश्‍वास वाढवण्‍यासाठी इंटीग्रेटेड करिक्‍युलम आणि प्रशासकीय कामांमध्‍ये एकप्रवाह आणण्‍यासाठी, कार्यरत कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी व शाळांना कृतीशील डेटा इनसाइट्स प्रदान करण्‍यासाठी स्‍मार्ट स्‍कूल सिस्‍टम्‍स यांचा समावेश आहे. लीडसोबत शाळा सुधारित शैक्षणिक कामगिरी व प्रवेशांचे सर्व फायदे मिळवू शकतात. एआय-पॉवर्ड शाळांचे विद्यार्थी विषयांबाबत सखोल ज्ञान मिळवू शकतात आणि कम्‍युनिकेशन, कोलॅबोरेशन व क्रिटीकल थिंकिंग यांसारखी महत्त्वपूर्ण २१व्‍या शतकातील कौशल्‍ये निर्माण करू शकतात.        

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…