Home सामाजिक  “दक्षिणोत्तर”; मतदार संघाचा भेदभाव न ठेवता कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य :श्री क्षीरसागर

 “दक्षिणोत्तर”; मतदार संघाचा भेदभाव न ठेवता कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य :श्री क्षीरसागर

29 second read
0
0
40

no images were found

 “दक्षिणोत्तर”; मतदार संघाचा भेदभाव न ठेवता कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य :श्री क्षीरसागर

 

कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामास प्राधान्य देणे, नागरिकांना न्याय देण्याच काम करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच मतदारसंघाचा कोणताही भेदभाव न ठेवता दक्षिणोत्तर विकास पर्व सुरु आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यास कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील बरेच प्रश्न, विकास कामे मार्गी लागली आहेत. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहराचा विकास हाच ध्यास ठेवून कार्य सुरु असून, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून प्र.क्र.६३ अंतर्गत थोरवत घर ते हवामहल मेनरोड पर्यंत गटर चॅनेल करण्याच्या कामास रु.३७ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा शुभारंभ आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.                                                               यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोणताही राजकीय हेतू न ठेवता सामाजिक हेतूने विकास कामे होणे गरजेचे आहे. त्याचमुळे मतदारसंघाचा भेदभाव न ठेवता दक्षिणोत्तर विकास कामाचे पर्व सुरु करण्यात आले आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्थानिकांमध्ये दोन गट पाडून राजकीय पोळी भाजण्याचाच प्रयत्न झाल्याने दक्षिण मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. परंतु, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघाच्या विकासातून शहराचा विकास साध्य करण्याचे धोरण ठरविले आहे. मंजूर विकास कामांना काही विरोध करण्याचे काम करत आहेत. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करता येत नसल्यानेच काम करणाऱ्याला राजकीय हेतूने बदनाम केले जाते. आगामी काळात दक्षिण मतदारसंघात जास्तीत जास्त निधी मतदार संघाच्या विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

        यावेळी बोलताना माजी महापौर राजू शिंगाडे यांनी, जन विकास आणि शहर विकास हेच श्री.राजेश क्षीरसागर यांचे ध्येय असून, त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी ते झटत आहेत. राजर्षी शाहू महाराजांची कोल्हापूर नगरी आहे आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला विचार डोळ्यासमोर ठेवून श्री.क्षीरसागर समाजसेवेचे काम करत आहेत. सर्वसामान्यांचे काम कसं पूर्ण होईल, याकडे जातीने लक्ष देवून ते काम तडीस नेण्याचे कर्तुत्व त्यांच्याकडे असल्यानेचे त्यांची दक्षिण मतदारसंघातही लोकप्रियता वाढत आहे. श्री.राजेश क्षीरसागर यांना विजयाने हुलकावणी दिली पण त्यांचा विकासाचा चौफेर महामेरू कोणीही रोखू शकले नाहीत. त्यामुळे श्री.राजेश क्षीरसागर विकास कामांच्या बाबतीत अपराजित असल्याचे सांगितले.

          यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक सुरेश ढोणूक्ष, शिवसेना महिला आघाडी दक्षिण शहरप्रमुख अमरजा पाटील, युवती सेना शहर अधिकारी नम्रता भोसले, शहर समन्वयक संतोष घाटगे, जेष्ठ शिवसैनिक सुशील देसाई, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, शिवसेना उपशहरप्रमुख टिंकू देशपांडे, विभागप्रमुख क्षितीज जाधव, राजकुमार ओसवाल, उदय धारवाडे, नजीर पठाण, तानाजी गुडाळे, सागर जाधव,नारायण इंगोले, प्रवीण चव्हाण, रविंद्र नलवडे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष घोडेराव, अश्विन शेळके, आकाश सांगावकर, दादू शिंदे आदी भागातील नागरिक, मंडळाचे संचालक सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…