no images were found
नाम.चंद्रकांत दादांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या पक्षाआंतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन राज्यातील सर्व ठिकाणी जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्यात आले. यानंतर जिल्हाध्यक्षांनी आपली जिल्हा कार्यकारणी जाहीर केली या नूतन कार्यकारिणी बद्दल काही ठिकाणी जिल्हयातील माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा जिल्हा कार्यालयात तालुका निहाय माजी पदाधिका-यांची भेट घेऊन त्यांची भूमिका समजून घेतली. तालुका स्तरावर राजकीय पार्श्वभूमी समजून घेऊन,जुन्या आणि नव्यांचा समन्वय साधत सर्वच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात या पदाधिकाऱ्यांना नूतन कार्यकारिणी मध्ये सामावून घेण्याचे आश्वासन याप्रसंगी नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे.
पक्ष वाढत असून कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत अशा सर्वांना एकत्र घेऊन आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मतभेद न ठेवता एकत्र येऊन एकदिलाने कार्यरत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कुटुंबप्रमुख आणि पालक या नात्याने मनमोकळा संवाद दादांशी झाल्याने या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.