no images were found
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान समितीकडून भाविकांची सोय
कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहता पागा इमारत येथे स्वच्छतागृह करणेत आले आहे. त्याच पद्धतीने येणारा भाविक प्रथम पार्किंग ठिकाणी येत असतो पार्किंग ठिकाणी देखील स्वच्छतागृहाची सोय असणे आवश्यक आहे याचा विचार करता इंडोकाऊंट फाउंडेशन यांचे कडून भाविकांच्या सोयीसाठी महिला व पुरुष यांच्याकरिता स्वतंत्र स्टेनलेस स्टील मधील मोबाईल टॉयलेट व्हॅन पुरविण्यात आल्या आहेत. सदर मोबाईल टॉयलेट व्हॅन आज देवस्थान समितीकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. सदर मोबाईल टॉयलेट व्हॅन या बिंदू चौक येथील वाहनतळाच्या ठिकाणी बसवण्यात येणार असून त्याचा भाविकांच्या साठी चांगला उपयोग होणार आहे. सदर 2 टॉयलेट व्हॅन आज रोजी देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी इंडोकाउंट फाउंडेशनचे संचालक कमाल मित्रा, महाव्यवस्थापक संदीप कुमार, सहायक महाव्यवस्थापक राजेश मोहिते, वरिष्ठ csr सल्लागार अमोल पाटील, अमर यादव व मेडिकल टीम, माजी नगरसेवक आदिल फरास, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, प्र. अभियंता सुयश पाटील कोल्हापूर व इतर कर्मचारी उपस्थित होते.