
no images were found
दक्षिण द्वार दरवाजास लावून असलेल्या चप्प्ल स्टॅण्डवर केलेली कारवाई ही कायदेशीरच
कोल्हापूर – श्री अंबाबाई मंदीराचे दक्षिण द्वार दरवाजास लावून असलेल्या चप्प्ल स्टॅण्डवर केलेली कारवाई ही कायदेशीरच आहे. या ठिकाणी जीवन भूपाल पाखरे व गणेश भूपाल पाखरे यांना श्री अंबाबाई मंदीराच्या दक्षिण दरवाजा भिंतीस चिटकवून लावलेल्या चप्पल स्टॅण्ड 15 दिवसात काढून घेणेकरीता दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी रितसर व कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सदरची नोटीस मिळून सुध्दा पाखरे यांनी वादातील दक्षिण दरवाजाच्या भिंतीस लागून असलेले चप्पल हटविणे ऐवजी त्यांनी त्यांच्या वकीलाच्या मार्फत महानगरपालिकेला उत्तर पाठवून चप्पल स्टॅण्ड हटविण्यास इन्कार केला.
वास्तविक, पाखरे कुंटुंब हे सदर प्रकरण रे.क.नं.815/2023 ने न्यायप्रविष्ठ आहे. असे सांगत आहे. परंतू रे.क.नं.815/2023 या दाव्यात श्री अंबाबाई मंदीराच्या गरुड मंडप शेजारील चप्पल स्टॅण्ड हटविणे याकरीता मनाईचा दावा दाखल केला होता. रे.क.नं.815/2023 या दाव्यात महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या भिंतीस चिटकवून ठेवलेल्या चप्पल स्टॅण्डचा उल्लेख नव्हता. कोल्हापूर महानगरपालिकेने पाखरे यांना चप्पल स्टॅण्ड लावणेकरीता अधिकृतपणे जागा दिली नव्हती. अगर चप्पल स्टॅण्ड लावणे करीता अनुमती ही दिली नव्हती. सदर पाखरे यांना सार्वजनिक ठिकाणी चप्पल स्टॅण्ड लावणेचा हक्क व अधिकार नव्हता व नाही.
सध्य स्थितीमध्ये भाविकांना व भक्तांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत मंदीराशेजारी जुने करवीर प्रांत लगत विनामुल्य भव्य चप्पल स्टॅण्डचे सुसज्ज सेवा सुविधा व सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे भाविकांना त्यांची पादत्राणे विनामुल्य ठेवणेची सोय करण्यात आली आहे. तसेच पोलिस निरिक्षक कोल्हापूर यांनी दि.2 मे 2023 रोजी सुरक्षा विभाग राज्य व केंद्रीय गुप्तचर विभाग व पोलिस निरिक्षक जुना राजवाडा पोलिस ठाणे यांच्या समवेत अंबाबाई मंदीराच्या धर्मस्थळाची संयुक्त सुरक्षा ऑडिट तपासणीमध्ये चप्पल स्टॅण्डवर सुरक्षेचा दृष्टीने योग्य नाही. त्यावर उपाययोजना करणेबाबत कळविले होते. त्याचप्रमाणे चप्पल स्टॅण्ड तात्काळ हटविणेबाबत पोलिस निरिक्षक जुना राजवाडा यांनी दि.09 मार्च 2023 रोजी पत्राने कळविले आहे. त्यामुळे दक्षिण दरवाजा लगत भिंतीस चिटकवून ठेवलेले चप्पल स्टॅण्ड मंदिराच्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक व धोकादायक बनले असलेने महाराष्ट्र महानगरपालिकेच्या कायद्यातील तरतूदी अन्वये प्राप्त हक्क व अधिकारानुसार व न्यायालयाचा सन्मान व आदर राखून कारवाई केलेली आहे. त्यामध्ये महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारे अकसाने अगर बेकायदेशीर कारवाई केलेली नाही.