Home Uncategorized महाराष्ट्राचा कौल विकासालाच..  मसालाकिंग डॉ धनंजय दातार

महाराष्ट्राचा कौल विकासालाच..  मसालाकिंग डॉ धनंजय दातार

57 second read
0
0
5

no images were found

महाराष्ट्राचा कौल विकासालाच..  मसालाकिंग डॉ धनंजय दातार

 

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला २०० हून अधिक जागा देत निर्विवाद बहुमत दिले आहे. हा निकाल महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेलअसे एक उद्योजक या नात्याने वाटते. कारण कोणत्याही राज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगती ही शासकीय धोरणांच्या स्थिरतेवर अवलंबून असते आणि धोरणे स्थिर राहण्यासाठी तेथील राजवट मजबूत असावी लागते. अशा शब्दांत अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स, दुबई, युएई चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ धनंजय दातार यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, केंद्रात व महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे एकाच आघाडीचे, एकविचाराने चालणारे आणि विकासाभिमुख सरकार काम करणार असल्याने आगामी काळात अस्थिर सरकार, तडजोडीचे सरकार किंवा राष्ट्रपती राजवट अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागणार नाही आणि विकासासाठी केंद्रीय निधीचीही कमतरता भासणार नाही, हे खूप आश्वासक आहे.

  महायुतीच्या गेल्या शासनकाळात राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टी मुळे महाराष्ट्रात प्रगतीची व्यापक आणि वेगवान पावले पडलेली दिसली आहेत. त्याच दमदार वाटचालीचा पुढचा टप्पा भविष्यकाळातही कायम राहील. पायाभूत सुविधा विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ततेच्या टप्प्यात आहेत. त्यातील काही महाराष्ट्राइतकेच देशाच्या भरभराटीसाठीही महत्त्वाचे आहेत. समृद्धी महामार्गमेट्रोबुलेट ट्रेननवे रस्ते व रेलमार्ग बांधणी तथा विद्यमान मार्गांचा विस्तारवेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळप्रस्तावित वाढवण बंदर ही त्यापैकी काही उदाहरणे. महाराष्ट्रात गुंतवणूकवाहतूकआयात-निर्यातऔद्योगिक विकास यांना पुढील पाच वर्षांत जोरदार चालना मिळेलज्याचा परिणाम राज्याची आर्थिक भरभराट होण्यावर होईल. नव्या सरकारला आणि नेतृत्वाला अनेक शुभेच्छा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…