
no images were found
टाटा एआयए तर्फे प्रो- फिट लाँच
मुंबई – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स (टाटा एआयए लाइफ) या भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एका कंपनीने ‘टाटा एआयए प्रो- फिट’ हे अनोखे आणि ग्राहकांच्या वैयक्तिक गरजा पुरवणारे आरोग्यविषयक उत्पादन तयार केले आहे. या अनोख्या उत्पादनामध्ये वैद्यकीय खर्च, आरोग्य व स्वास्थ्याशी संबंधित विविध फायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर या उत्पादनाच्या मदतीने संपत्ती निर्मितीही शक्य असल्यामुळे अडचणीच्या वेळी चांगली मदत होऊ शकते.
नव्या उत्पादनाचे लाँच जाहीर करताना टाटा एआयए लाइफचे अध्यक्ष आणि मुख्य वित्त अधिकारी समित उपाध्याय म्हणाले, ‘गंभीर आजार कोणत्याही वयात होऊ शकतात आणि त्यामुळे मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते. उपचार पूर्ण झाल्यानंतरही कित्येकदा हे आजार परत होण्याची शक्यता असते. त्याशिवाय निदान आणि उपचारानंतर काळजी घेण्यासाठी येणारा खर्चही मोठा असतो. आरोग्यासाठी खर्च होणाऱ्या रकमेमधील ६५ टक्के वाटा ऑउट-ऑफ-पॉकेट (स्वखर्चातून) असल्याचे वास्तव देशातील आरोग्य विमा उत्पादनांमध्ये असलेली दरी व त्याची अपुरी व्याप्ती दर्शवणारे आहे. टाटा एआयए प्रो- फिट हेल्थ प्लॅन ही योजना कंपनीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व त्यांनी निवडलेला कालावधी, शिवाय संपूर्ण जीवनभर सुरक्षा कवच देणारी आहे.
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावयासिकाने शिफारस केल्यानंतर योजनेतील आरोग्याशी संबंधित विड्रॉवल्स करमुक्त (प्राप्ती कराचे लाभ प्रचलित प्राप्ती कर कायद्यानुसार) असतील. त्यात पूरक व पर्यायी वैद्यकीय खर्च उदा. आयुर्वेद, होमिओपथी, पंचकर्म, पोषण तत्वे इत्यादींशी संबंधित खर्चाचा समावेश असेल. ग्राहकांना मेडिक्सच्या पॅनेलवर जगभरात असलेले डॉक्टर्स व सल्लागार यांच्याकडून गंभीर आजारावर उपचार करताना मेडिकल केस मॅनेजमेंटसह (पीएमसीएम) तज्ज्ञ सल्ला मिळतो.
विमाधारकांना वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत या वैशिष्ट्यांचा लाभ मिळत असल्यामुळे उतारवयात चिंता करण्याची गरज राहात नाही. त्याशिवाय स्मार्ट लेडी डिस्काउंट या सुविधेमुळे स्त्री विमाधारकांना पहिल्या वर्षातील रायडर प्रीमियवर २ टक्के आणि युलिप फंडात अतिरिक्त ०.५ टक्के युनिट्स मिळतात. वयाची तिशी गाठण्यापूर्वी ही योजना खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या प्रीमियमवर २ टक्के सवलत दिली जाईल. ट्रान्सजेंडर ग्राहकांनाही पहिल्या वर्षात २ टक्के प्राइड सवलत दिली जाणार आहे.