
no images were found
बॉलिवुड सुपरस्टार रणवीर सिंग बनला लाव्ही (Lavie) स्पोर्टचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
मुंबई: उत्पादनांच्या योग्य निवडीसह सक्रिय जीवनशैली अधिक दृढ करण्याच्या दृष्टिकोनासह ब्रॅण्ड लाव्ही स्पोर्ट ने नुकतेच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवुड सुपरस्टार रणवीर सिंगची निवड केली आहे. सुपरस्टार रणवीरसोबतच्या सहयोगामधून लाव्ही स्पोर्टची आजच्या स्टाइलप्रती जागरूक तरूणांच्या अॅथलेजर मागण्यांची पूर्तता करण्याप्रती, तसेच त्यांच्या विद्यमान ग्राहकवर्गाशी संलग्न राहण्याप्रती कटिबद्धता दिसून येते. सक्रिय जीवनशैलीला चालना देण्याच्या ब्रॅण्डच्या मुलभूत तत्त्वाला अधिक दृढ करत लाव्ही स्पोर्टचे टिकाऊपणा, स्टाइल व सुधारित सुरक्षितता देत ग्राहकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणाऱ्या बॅग्स् प्रदान करण्याचे ध्येय आहे.
समकालीन, वैविध्यपूर्ण व आधुनिक उत्पादनांची व्यापक श्रेणी असलेल्या लाव्ही स्पोर्ट ब्रॅण्डमध्ये बॅकपॅक्स, डफल बॅग्स्, लॅपटॉप बॅग्स् वॉलेट्स इत्यादींसारख्या विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने वीकेण्डस् गेटवे किंवा व्हेकेशन, ऑफिस, जिम किंवा तुमची जाण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही ठिकाणासाठी परिपूर्ण आहेत. रणवीर डिजिटल व सोशल मीडियावरील जाहिरातींच्या माध्यमातून नवीन कलेक्शनसह ब्रॅण्डच्या विद्यमान पोर्टफोलिओला समर्थन देताना पाहायला मिळेल. सुपरस्टार रणवीर सिंगच्या सहयोगातून लाव्ही स्पोर्टस् आजच्या स्टाईलप्रती जागरूक तरूणांसाठी अॅथलेजरची पुर्तता करण्यासाठी तसेच त्यांच्या विद्यमान ग्राहकवर्गाशी संलग्न राहण्याप्रती कटिबद्ध आहेत.
तसेच, लाव्ही स्पोर्टच्या ओळखीशी बांधील राहत रणीवर सिंगने त्याची अद्वितीय अभिनय कौशल्ये, उत्साह मोहकता आणि फॅशन व स्टाईलच्या अद्वितीय भावनेसह प्रेक्षकांना नेहमी मंत्रमुग्ध केले आहे. म्हणून ब्रॅण्डचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी, तसेच लाव्ही स्पोर्ट श्रेणीला पसंतीची निवड म्हणून स्थापित करण्यासाठी त्याची निवड केली आहे. त्याचे अप्रतिम कार्य, बहुआयामी कौशल्य व उत्साही व्यक्तिमत्व ब्रॅण्डच्या उत्पादनांसाठी उच्च दर्जाच्या व भावी डिझाइन्सप्रती नाविन्यतेमधील सतत प्रयत्न व कटिबद्धतेशी संलग्न आहे. ब्रॅण्डच्या व्यापक पोर्टफोलिओ विस्तारीकरणामध्ये रणवीरच्या करिष्माई व्यक्तिमत्त्वाची भर करत लाव्ही स्पोर्टचे आपल्या विकासगतीला अधिक चालना देण्याचे ध्येय आहे आणि ब्रॅण्ड भारतीय अॅक्सेसरीजच्या बाजारपेठेत सिंहाचा वाटा संपादित करण्याचा प्रयत्न करतो.
या सहयोगाबाबत आपले मत व्यक्त करत लाव्ही व लाव्ही स्पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक आयुष तैनवाला म्हणाले, ‘‘लाव्ही स्पोर्टमध्ये आम्ही नेहमी सर्वोत्तमतेचा शोध घेतो आणि आमचे उच्च मानक स्थापित करण्याचे ध्येय आहे. आम्हाला बाजारपेठेच्या गतीशीलतेबाबत माहित आहे, तसेच आम्ही ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारे आधुनिक ट्रेण्डस् सादर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्या प्रत्येक पावलासह सर्वोत्तमतेचे नवीन मानक स्थापित करणाऱ्या व्यक्तीचे लाव्ही स्पोर्टमध्ये स्वागत करणे स्वाभाविक आहे. आम्हाला आमच्या समूहामध्ये रणवीर सिंगचा समावेश करण्याचा आनंद होत आहे.