
no images were found
पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत चर्चेनंतर इस्राईलची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्यांहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत इस्रायलच्या पंतप्रधानांचे आभार मानले आहे. आपण इस्रायलसोबत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. फोनवर चर्चेनंतर इस्रायलने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिली माहिती
पीएम मोदींनी ट्विटर वर लिहिले की, ‘मी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा फोन कॉल आणि चालू परिस्थितीबाबत अपडेट्स दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो. नेतन्याहू यांनी इस्लामिक दहशतवादी गट हमासचा बदला घेण्याचे वचन दिले आहे जे ‘पिढ्यान् पिढ्या प्रतिध्वनित होईल.’
हमासने इस्रायलला इशारा दिला होता की, जर त्यांनी बॉम्बफेक थांबवला नाही तर ते इस्रायलमधून अपहरण केलेल्या लोकांना मारण्यास सुरुवात करेल. त्याचवेळी बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धातून माघार घेण्यास नकार दिला आहे. भविष्यात आपण जी पावले उचलणार आहोत त्याचा थेट परिणाम आपल्या भावी पिढ्यांवर होईल, असे नेतन्याहू यांनी एक निवेदन जारी केले.
इस्रायलने मानले भारताचे आभार
भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी म्हटले की, आम्हाला आमच्या भारतीय बंधू-भगिनींकडून खूप पाठिंबा मिळत आहे. दुर्दैवाने मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या आभार मानू शकत नाही. कृपया आमच्या सर्व मित्रांचे कृतज्ञता म्हणून हे स्वीकार करा.
पंतप्रधान मोदींच्या विधानाला उत्तर देताना, इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन म्हणाले, “धन्यवाद , भारताचा नैतिक पाठिंबा खूप कौतुकास्पद आहे. इस्रायलचा विजय होईल.” हा ट्रेंड सुरू झाल्यानंतर त्याच दिवशी इस्रायलने भारतातील लोकांचे आभार मानले. “धन्यवाद भारत,” इस्रायलच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या डिजिटल डिप्लोमसी टीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले.