
no images were found
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या विचारधारेवर भाजपची वाटचाल, कराडमध्ये झाली भाजपा संघटन पर्व अंतर्गत बैठक
कोल्हापूर (प्रतिनिधी):-भाजपा संघटन पर्व वस्ती संपर्क अभियानांतर्गत कराडमध्ये आढावा बैठक झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयातील भाजपचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनीही या बैठकीला हजेरी लावली. राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या विचारधारेवर भाजप वाटचाल करत आहे. संघटना आणि राष्ट्रहीत महत्वाचं असून, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी कमळ हीच ओळख आहे, असं रविंद्र चव्हाण यांनी नमुद केलं. महाराष्ट्रात भाजपनं दीड कोटी सदस्य संख्येचा पल्ला गाठल्याबद्दल, रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांचं कौतुक करत आभार मानले. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणाच्या योजना जनतेपर्यंत जाव्यात, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, अमल महाडिक, मनोज घोरपडे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह तीन जिल्हयातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.