no images were found
घरपोच मतदानातील पात्र मतदारांना वेळेत अर्ज पोहच करा – अमोल येडगे
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी व कागल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून सोयीसुविधा व अनुषंगिक कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी किमान सुविधांची पाहणी करून 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी वेळेत 12डी फॉर्म पोहच करा अशाही सूचना केल्या. सुरूवातीला जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी 47 कोल्हापूर लोकसभा मतदार क्षेत्रातील 275 कोल्हापूर करवीर विधानसभा मतदार संघामधील बालिंगा येथील मतदान केंद्र क्रमांक 249,250,251 व 252 वरील सुविधांचे निरिक्षण करून आवश्यक किमान सुविधा उपलब्ध करण्याचे व या कामात येणाऱ्या अडचणींबाबत अहवाल देण्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून किमान सुविधा, घरपाचे मतदान व मतदाराचे छायाचित्र, नावांची अचूक नोंदणी होत आहे का याबाबत भौतिक पडताळणी करून खात्री करण्याच्या सूचना दिल्या व पात्र व्यक्ती मतदार नोंदीपासून वंचित राहू नये व मतदार यादी अचूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी श्री येडगे यांचेसोबत, उपविभागीय अधिकारी वर्षा शिंगण- पाटील, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, गगनबावडा तहसिलदार बी जे गोरे, तहसिलदार राधानगरी अनिता देशमुख, तहसिलदार पन्हाळा माधवी शिंदे, तहसिलदार अमरदिप वाकडे, गट विकास अधिकारी पन्हाळा सोनाली माडकर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.
यानंतर जिल्हाधिकारी यांनी करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील मतदान केंद्राला भेट दिली. करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील मतदान केंद्र 161, 162, 163 व 164 वर पाहणी करून आवश्यक सूचना केल्या. तसेच कळे येथील मतदान केंद्रालाही भेट दिली. मतदान केंद्रावरील पाणी, शौचालय, दिव्यांगांसाठी रॅम्प, लाईट, केंद्राबाहेरील आवश्यक सावलीची सुविधा आदी विषयावर त्यांनी पाहणी केली. 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना 12 ड चे वाटप घरोघरी करण्यात येत आहे. नमुना 12 ड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरुन ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत दि. 12 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पोहोचणे आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत असे नमुना 12 ड मधील अर्ज स्विकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देणार आहेत. या सुविधेच्या अनुषंगाने मतदाराला कोणतीही शंका असल्यास अथवा माहिती हवी असल्यास आपल्या घरी
येणाऱ्या मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करावी याबाबतच्या सूचना उपस्थित बीएलओ यांना दिल्या.
कागल येथील आंतरराज्य सीमा चेक पोस्ट ची केली तपासणी
सायंकाळी कागल तालुक्यातील बिद्री, बोरवडे, मुरगुड व कागल शहरातील अधिकतम मतदान असलेली मतदान केंद्र व स्ट्राँग रूमची पाहणी करून राज्य सीमेवरील चेकनाक्याला भेट दिली. यात लिंगनूर, म्हाकवे, कोगनुल येथील चेक पोस्टचा समावेश होता. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे यांनी केलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी आचार संहिता अनुषंगाने तपासण्या करून कोणत्याही प्रकारे चुकीचा प्रकार घडू नये याबाबत सूचना केल्या. याअगोदर राधानगरी येथील अधिकतम मतदान असलेली मतदान केंद्र व स्ट्राँग रूमची पाहणी करून जिल्हा सीमा ठिकाणी असलेल्या नाक्याला भेट