Home क्राईम कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे तर्फे तिघा जणांवर कारवाई

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे तर्फे तिघा जणांवर कारवाई

2 second read
0
0
121

no images were found

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे तर्फे तिघा जणांवर कारवाई

कोल्हापूर( प्रतिनिधी) :पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी सुरू असणारी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे व अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पेठ वडगांव पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते बेंगलोर हायवे लगत असले गायकवाड पेट्रोल पंपाचे शेजारी असलेले हॉटेल जंम्भेश्वराय हायवे या हॉटेलचे पाठीमागील बाजूस लागून असलेले चार खोल्यांपैकी एका खोलीमध्ये अफू बोंडांचा साठा करून त्याची पावडर तयार करतात. तसेच गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्या बाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील सपोनि सागर वाघ व पोलीस अंमलदार यांचेसह जाऊन खात्री करून दि. 19.03.2024 रोजी सायंकाळी छापा टाकला असता आरोपी नामे 1 ) मनिष मोहनराम, वय 23, धंदा – हॉटेल मजुरी (समराथल हॉटेल, ओमसाई पेट्रोल पंप शेजारी, पुणे बेंगलोर हायवे लगत, पेठ वडगांव, कोल्हापूर) रा. उदयनगर, परिअल, जि. जोधपूर, राज्य- राजस्थान, 2) मोहन चोकलू चव्हाण, वय 45, धंदा व्यापार (चप्पल दुकान ) रा. हिंदमाता कॉलनी, वाठार, ता.हातकणंगले, कोल्हापूर, 3) अमिर सय्यद जमादार, वय 40, धंदा ट्रक मॅकेनिक, रा.प्रसाद हॉटेलच्या मागे, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हे मिळून आले. त्या ठिकाणी एकुण 40 किलो 4 ग्रॅम वजनाचा अफू हा अंमली पदार्थ, 1 किलो 195 ग्रॅम वजनाची बारीक पावडर व 01 किलो गांजा असा एकूण 5,21,400/- कि. रू. चा अंमली पदार्थ विक्री करण्याचे हेतुने मिळून आला. त्यांना मिळून आलेल्या मुद्देमालासह रितसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द पेठवडगांव पो ठाणे येथे एनडीपीएस कायदया अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, अपर पोलीस अधीक्षक, श्री. निकेश खोटमोडे-पाटील साो, श्रीमती जयश्री देसाई साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सपोनि सागर वाघ, सहा. फौजदार विजय गुरखे, पोहेकॉ 1168 विलास किरोळकर, पोहेकॉ 1584 नामदेव यादव, पोहेकॉ 949 सचिन देसाई, पोहेकॉ 1176 महेश गवळी, पोहेकॉ 1007 अमित सर्जे, पोना 2038 सागर चौगुले, पोकॉ 633 प्रविण पाटील, पोकॉ 2200 विनोद कांबळे, चालक- ग्रेड पोसई महादेव कुहाडे, व चालक – पोना 2040 सुशिल पाटील यांनी केली आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…