Home आरोग्य पंढरपुरात 137 वारकऱ्यांना विषबाधा

पंढरपुरात 137 वारकऱ्यांना विषबाधा

3 second read
0
0
37

no images were found

पंढरपुरात 137 वारकऱ्यांना विषबाधा

पंढरपुर : पंढरपुरामध्ये 137 वारकऱ्यांना विषबाधा झाली आहे. हे वारकरी माघी यात्रेनिमित्त पंढरपुरात आले होते. हे सर्व वारकरी भक्ती मार्गावरील संत निळोबा मठात थांबले होते. बुधवारी रात्री या सर्व भाविकांना उपवासाचा फराळ म्हणून भगर आमटी देण्यात आली होती. त्यातूनच त्यांना विषबाधा झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेवण झाल्यानंतर सर्व वारकरी रात्री झोपलेले असताना अचानक त्रास सुरु झाला. मध्यरात्री दोन वाजता सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व भाविकांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. सर्व वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. पंढरपुरात वारी काळात भेसळयुक्त पदार्थांची सरास विक्री होते.  अन्न औषध प्रशासन विभाग मात्र कारवाई  करत नसल्याने अशा घटना घडतात असा आरोप स्थानिक करत आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…