no images were found
सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये टेस्ट ट्यूब सेंटरचा लोकार्पण सोहळा.
कोल्हापूर : पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींजींच्या “निराधारांना आधार” या तत्वावर गेल्या एक तपापासून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाच्या वतीने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे एकाच छताखाली लोकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा गेली १२ वर्ष अविरत दिल्या जात आहेत. याच शृंखलेत सिद्धगिरी हॉस्पिटल येथे पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात पहिल्यांदाच ना नफा ना तोटा या तत्वावर केवळ नाममात्र खर्चात सेवा देणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे अत्याधुनिक सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. विजयनगर-कर्नाटकच्या पालकमंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, लोकनियुक्त एसपी यशोदा वंटगोडी, कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते व पाच हजार महिलांच्या उपस्थित दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सोहळा होत आहे, अशी माहिती कणेरी मठ येथील सिद्धगिरी जननी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी गुरुवारी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे झालेच्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात धर्मादाय श्रेणीत पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या चाचण्यांसह एकाच छताखाली आय. व्ही. एफ. सेवा उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. आज वंध्यत्व विवारणासाठी उपचार घेणे हि सामान्यांच्या आवाक्यातील बाब राहिलेली नाही. अपत्य प्राप्तीसाठी आज अनेक दांपत्य वैद्यकीय उपचार घेत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात वंध्यत्व हि एक गंभीर समस्या होऊ शकते. यावर उपचार घेणे सामान्य लोकांना परवडणारे नाही. हि सेवा सिद्धगिरी रुग्णालयाच्या ना नफा ना तोटा या तत्त्वानुसार इतरत्र असणाऱ्या सध्याच्या प्रस्तावित दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात व पारदर्शकपणे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या विभागाकरीता कर्नाटकच्या जोल्ले परिवाराने महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या हस्ते या विभागाचा लोकार्पण सोहळा होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपारिक आयुर्वेदिक उपचारांचा हि समावेश केल्यामुळे रुग्णांना दुष्परिणाम विरहीत सेवा मिळणार आहे. ज्यांना लग्न होवूनही अनेक वर्ष अपत्य झाले नाहीत अशा दांपत्याकरिता उपचार करण्यासाठी सिद्धगिरी जननी विभाग आशेचा किरण ठरेल या सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन स्वामींनी केलयं. यावेळी डॉ. वर्षा पाटील यांनी या विभागाच्या तंत्रज्ञानाची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकार परिषदेस विवेक सिद्ध, सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश भरमगौडर, डॉ. संदीप पाटील, धनंजय जाधव, राजेंद्र शिंदे, कुमार, चव्हाण, सागर गोसावी आदी उपस्थित होते.