no images were found
भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. त्यानी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. विधानपरिषद निवडणुकीत भाजपने म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिला विजय मिळाला आहे. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारपेक्षा जास्त मत पडली असून शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ 9 हजार 500 मते पडली आहेत. हा महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षात मी जे काम केले, त्याची ही पोचपावती आहे. कोकण विभागातील शिक्षकांनी मला चांगला पाठिंबा दिला आहे. तब्बल 33 संघटनाचा आम्हाला पाठिंबा होता. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आज सार्थकी लागला आहे.