Home शैक्षणिक दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी,परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल

दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी,परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल

6 second read
0
0
199

no images were found

दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी,परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल

मुंबई :  दहावी  बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना  दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे.  सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी  3 वाजता अशी पेपरची वेळ आहे. आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10  मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे. 

उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे दिसून आले आहे. याची मंडळाने दखल घेऊन कारवाई केली. या गैरप्रकारांवर प्रतिबंध घालण्यासाठी  बोर्डाने परिपत्रक पाऊल उचलले आहे.  यापुढे परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देता येणार नसल्याचे मंडळाने सांगितले आहे.

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र यावेळी परीक्षेत काही बदल करण्यात आले आहे. ज्यात गेल्यावर्षी परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. सोबतच दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …