Home क्राईम ‘मुलगी बोलत नाही’ म्हणून सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची महाविद्यालयातच आत्महत्या

‘मुलगी बोलत नाही’ म्हणून सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची महाविद्यालयातच आत्महत्या

4 second read
0
0
51

no images were found

‘मुलगी बोलत नाही’ म्हणून सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची महाविद्यालयातच आत्महत्या

बुलढाणा : जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने वर्गाच्या खोलीतील सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणातून या विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोट  देखील आढळली. त्यात ‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते’ असा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली.बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाती ही घटना घडली. सूरज रामकृष्ण गावंडे अस आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो जळगाव जामोद तालुक्यातील येणंगाव इथला रहिवासी होता. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या वर्ग खोलीतच सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. काल संध्याकाळी ही घटना सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली. त्याने तातडीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तसंच पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

      पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन विद्यार्थ्याच्या मृतदेहाच्या शेजारुन सुसाईड नोट हस्तगत केली. “एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते…!” असा उल्लेख या नोटमध्ये केलेला आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …