
no images were found
विपिन हिरो मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये मल्खान सिंगच्या भूमिकेत सामील झाले!
मॉडर्न कॉलनीमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, जेथे मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील लोकप्रिय पात्र मल्खान सिंग पुनरागमन करत आहे. ही आयकॉनिक भूमिका साकारत असलेले अभिनेता विपिन हिरो, जे मालिकेमध्ये हास्य, जुन्या आठवणी आणि नवीन उत्साहाची भर करतील. आपला आनंद व्यक्त करत विपिन हिरो म्हणाले, “मालिका ‘भाबीजी घर पर है’चा भाग असण्याचा आनंद होत आहे. मी वर्षानुवर्षे या मालिकेची प्रशंसा केली आहे आणि आता प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेले पात्र मल्खानची भूमिका साकारणे मोठा सन्मान आहे. आनंद होण्यासोबत मी काहीसा नर्व्हस देखील आहे. अशा लोकप्रिय भूमिकेला योग्य न्याय देण्याची मोठी जबाबदारी आहे.”
विपिन या भूमिकेची अद्वितीय स्टाइल व विनोदीशैली समजून घेण्यासाठी जुने एपिसोड्स पाहत आहेत. ते म्हणाले, “मल्खानला वेगळी ठरवणारी बाब म्हणजे त्याची विशिष्ट शैली, जो मनापासून खूप दयाळू आहे. मी मालिकेमध्ये तीच मोहकता आणण्यासाठी अथक मेहनत घेत आहे. काळासह, मी भूमिकेमध्ये माझ्या व्यक्तिमत्त्वाची भर करेन, पण भूमिकेचे पैलू कायम राहतील, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत.” रोचक बाब म्हणजे स्वर्गीय अभिनेते दीपेश भान यांनी पूर्वी साकारलेली ही भूमिका विपिन यांनी साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते पुढे म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी मी एडिट २ शोमधील दीपेश यांनी साकारलेली भूमिका साकारली होती. मी पुन्हा एकदा त्यांनी साकारलेली लोकप्रिय भूमिका साकारत असण्याची कल्पना कधीच केली नव्हती. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी मी निर्माते व चॅनेलचे आभार व्यक्त करतो. टीम अत्यंत उत्साही व स्वागतार्ह होती, ज्यामुळे सर्वकाही सुरळीत घडले. माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे, कारण आम्ही सर्व या मालिकेचे मोठे चाहते आहोत. मला या मालिकेचा भाग असण्याचा खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.”