
no images were found
कोल्हापूरची हद्दवाढ माझ्या पद्धतीने करणार -मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रलंबित प्रकरणात आता नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष घातले आहे. शहराच्या लगतची गावे हद्दवाढीत घेतली जातील. हद्दवाढ माझ्या पद्धतीने करणार आहे, असे सांगत मुश्रीफ यांनी १८ गावांनी बंद पाळण्याची गरज नाही, असा सल्ला दिला.
कोल्हापूर महापलिकेत कोल्हापूर शहराच्या विकास कामासंदर्भात पालकमंत्री मुश्रीफ यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली यावेळी ते म्हणाले, येत्या काही दिवसांत कोल्हापूरची महानगरपालिका हद्दवाढ होणार आहे. प्रस्तावित हद्दवाढीमध्ये शिरोली, नागाव, वळीवडे – गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे,उचगाव, वाडी पीर,आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी या १८ गावांसह शिरोली आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसी या २ औद्योगिक वसाहती यांचा समावेश आहे.