no images were found
न्यू पॉलिटेक्निकमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त रोटरी क्लबचा कार्यक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी): १० ऑक्टोबर २०२३ या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर राॅयल्स अंर्तगत रोटरी क्लब ऑफ न्यू पॉलिटेक्निकच्या वतीने डाॅ. चैत्रा राजाज्ञा यांचे ‘जिंदगी ना मिले दोबारा’ हे मानसिक आरोग्यपर व्याख्यान झाले. व्याख्यानामध्ये त्यांनी युवकांमधील बळावत चाललेल्या डिप्रेशन, शैक्षणिक ताणतणाव, चिडचिड, आत्महत्या या मानसिक आजारांसंदर्भात विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानास न्यू पॉलिटेक्निक आणि न्यू माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ न्यू पॉलिटेक्निकच्या वर्ष २०२३-२४ साठीच्या नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना पदभार प्रदान करण्यात आला. नुतन कार्यकारिणी अशी, अध्यक्ष परेश लोहार, उपाध्यक्ष क्षितीज गोरे, सेक्रेटरी ऋषिकेश सुतार व ट्रेझरर अभिनव खांडेकर.
कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लबचे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व गोवा प्रांताचे गव्हर्नर रोटरीयन नासिर बोरसादवाला यांचे हस्ते झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर राॅयल्सच्या अध्यक्षा रोटरीयन सुषमा धर्माधिकारी, क्लब सेक्रेटरी रोटरीयन प्रेमा चौगुले, हेल्थ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर रोटरीयन डाॅ. गौरी देशपांडे, प्रोजेक्ट हेड रोटरीयन तथा श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरच्या संचालिका सविता पाटील तसेच विभागप्रमुख व स्टाफ उपस्थित होते.
प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. रविंद्र यादव, सूत्रसंचालन प्रा. शामली चव्हाण व आभार प्रदर्शन परेश लोहार यांनी केले.